विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक मतदार संघात चुरशीच्या लढती आहेत. त्या पैकीच लढत येवला मतदार संघात होत आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ मैदानात आहेत. त्यांच्या समोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांनी आव्हान उभं केलं आहे. भुजबळांना पहिल्यांदाच मोठं आव्हान असल्याचं दिसत आहे. पण आपल्या विजयाबाबत भुजबळ निर्धास्त आहेत. विजय पक्का आहे. आपण 60 ते 70 हजार मताच्या फरकाने विजयी होवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकीकडे भुजबळांनी येवल्यातील विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे त्यांनी समीर भुजबळ लढत असलेल्या नांदगाव विधानसभा मतदार संघाकडे ही लक्ष दिले आहे. त्यांनी मतमोजणी पुर्वी मनमाडला भेट दिली. या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांची दहशत असल्याचा आरोप भुजबळांनी केला आहे. यावेळी त्यांनी समीर भुजबळ यांची भेट घेतली. कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात धमक्या येत आहेत असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'सगळ्यांना माझी गरज लागते,पण...' विरारमधील राड्यानंतर हितेंद्र ठाकूर कोणा बरोबर?
शिवाय जे मतदान प्रतिनिधी आहेत. त्यांची पोलिसच चौकशी करत आहेत. त्यांना धमकावलेही जात आहे असा आरोप भुजबळांनी केला आहे. असे मतदार संघात वातावरण असेल तर मतदान प्रतिनिधी द्यायचे की नाही असा प्रश्न भुजबळांनी केला आहे. मतदान प्रतिनिधींनी मतमोजणी केंद्रावर जायचे की नाही ते ही सांगा असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला आहे. अनेक कार्यकर्ते रडत होते. त्यांना मारहाण केली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा धर्म पाळावा असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.
निवडणुकीत 'निकाल' लागणार आहे असं म्हणत कांदेना इशारा दिला आहे. 24 तास असेही निघून जातील. पोलिस दबावाखाली काम करत आहेत. ते विकले गेले आहेत असा थेट आरोप भुजबळांनी केला. जनता जेव्हा उठते तेव्हा मोठे मोठे साम्राज्य उखडून पडतात. तिथे पोलिसांचे काय घेवून बसलात असंही ते म्हणाले. मतदान प्रतिनिधींना त्रास देवू नका. कायदा आणि सुव्यवस्था आम्ही पाळू. समोरच्यानेही पाळावी असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येईल असं ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world