जाहिरात

Gaurav More : "मुंबईतून चालता हो, पुन्हा दिसलास तर याद राख", शारीब हाश्मी गौरव मोरेवर भडकला

'फॅमिली मॅन फेम' अभिनेता शारीब हाश्मी गौरव मोरेला मुंबईत बाहेर चालता हो असा दम देताना दिसत आहे, असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Gaurav More : "मुंबईतून चालता हो, पुन्हा दिसलास तर याद राख", शारीब हाश्मी गौरव मोरेवर भडकला

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला गौरव मोरे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. हास्यजत्रेत नावलौकिक मिळवल्यानंतर गौरव हिंदीमध्ये काम करताना दिसत आहे. मात्र 'फॅमिली मॅन' फेम अभिनेता शारीब हाश्मी गौरव मोरेला मुंबईबाहेर चालता हो असा दम देताना दिसत आहे, असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

शारीब हाश्मीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गौरव आणि त्याचा एक कॉमेडी व्हिडीओ शेअर केला आहे. शारीबने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'फिल्टरपाडा का कै-लास्ट खेर... विथ द अप्रतिम गौरव मोरे"

(नक्की वाचा- Deepika Padukone: रविवारी काम करण्याचा सल्ला, बड्या उद्योगपतीवर अभिनेत्री दीपिका पदुकोण संतापली, पोस्ट व्हायरल)

व्हिडीयोत दिसतंय की, गौरव मोरे शारीब हाश्मीकडे गाण्याची ऑडिशन देण्यासाठी आला आहे. गौरवने यावेळी कैलास खेरचं 'सय्या...' हे गाणं गायलं. मात्र गौरवचं बेसूर गाणं ऐकून शारीबने त्याला थेट मुंबईतून चालता हो असं सांगितल दिला. हा आतापर्यंत 3.75 लाख लोकांनी पाहिला आहे. तर या व्हिडीओला जवळपास 15 हजार लाईक्स आणि 300 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. 

(नक्की वाचा-  धनश्री-युजवेंद्रचा घटस्फोट 'या' व्यक्तीमुळे होतोय? तो फोटो व्हायरल झाल्याने झाला होता वाद )

शारीब हाश्मी आणि गौरव मोर लवकरच 'संगी' सिनेमात झळकणार आहे.  येत्या 17 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात विद्या माळवदे, संजय बिश्नोई, श्यामराज पाटील, मीरा जगन्नाथ, अरुण प्रभुदेसाई, मानिनी दुर्गे हे कलाकार देखील असणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com