जाहिरात

Harshil Kalia Death: अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

Actress Harshil Kalia Dies : अभिनेत्री आणि मॉडेल हर्षिल कालिया हिच्या कारचा जयपूरच्या शिप्रा पथ रोडवर भीषण अपघात झाला. कार दुभाजकाला धडकून उलटल्याने हर्षिलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

Harshil Kalia Death: अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

राजस्थानी चित्रपटसृष्टी आणि ग्लॅमर विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'क्राइम नेक्स्ट डोअर' फेम प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल हर्षिल कालिया (Harshil Kalia) हिचा जयपूरमध्ये भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा कामावरून घरी परतत असताना तिच्या कारचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.अ

अपघाताचा थरार आणि सीसीटीव्ही फुटेज

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षिल तिची कार स्वतः चालवत होती. शिप्रा पथ रोडवर अचानक कारचे नियंत्रण सुटले आणि ती वेगाने दुभाजकाला (Divider) धडकली. धडक इतकी जोरात होती की कार डाव्या बाजूला उलटली. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

स्थानिक नागरिकांची मदतीसाठी धाव

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी उलटलेली कार सरळ केली आणि हर्षिलला बाहेर काढले. तिला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. हर्षिलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

(नक्की वाचा-  Pune News: अंडरग्राउंट मेट्रोच्या वर बोअर मारल्याचा प्रकार; महामेट्रोचं मोठं नुकसान, गुन्हा दाखल)

कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. दुसऱ्या एखाद्या वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला का, या दिशेनेही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

कोण होती हर्षिल कालिया?

हर्षिल कालिया ही जयपूरमधील एक अभिनेत्री होती. तिने डिस्ने+ हॉटस्टारवरील 'क्राइम नेक्स्ट डोअर' या गाजलेल्या वेब सिरीजमध्ये काम केले होते. अभिनयासोबतच तिने एका न्यूज चॅनेलमध्ये अँकर म्हणूनही आपली ओळख निर्माण केली होती. अनेक लोकप्रिय राजस्थानी म्युझिक व्हिडिओमध्ये तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते. ती मिस दिवा राजस्थान 2021 ची रनर-अप होती आणि नुकतीच मॉडेलिंग क्षेत्रात मोठी झेप घेत होती.

हर्षिलचे वडील पत्रकारितेच्या क्षेत्राशी संबंधित असून एका खाजगी वृत्तपत्रात कार्यरत आहेत. एका तरुण आणि हुशार अभिनेत्रीच्या अशा अकाली जाण्याने जयपूरच्या कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com