
कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकीता प्रभू वालावलकर ही बिग बॉस मुळे चर्चेत आली. तिल्या या शोमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली. बिग बॉसच्या घरातून आल्यानंतर अंकीता कुणाल भगत बरोबर लग्न बंधनात अडकली. तिच्या लग्नाचीही चांगलीच चर्चा झाली. लग्न त्यानंतर तिचा गृह प्रवेश याचे व्हिडीओ ही तिच्या चाहत्यांच्या पसंतीला उतलले. आता अंकीत आपल्या पहिल्या परदेश वारीवर निघाली आहे. याची माहिती तिने तिच्या इन्स्टाग्रामवर दिली आहे. शिवाय ती कुठे जाणार आहे ते ही तिने सांगितले आहे. विशेष म्हणजे या वारीत ती कुणाबरोबर चालली आहे हे तिने आवर्जून सांगितले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंकीता आपली पहिली परदेशावारी युरोपमध्ये करत आहे. ती फ्रँकफर्डला फिरण्यासाठी गेली आहे. ती युरोपमधल्या काही देशांत फिरणार आहे. त्यात लक्झमबर्गचा ही समावेश आहे. ती फिरण्यासाठी एकटी गेली नाही. ती तिच्या नवऱ्या बरोबर म्हणजेच कुणाल भगत बरोबर युरोपच्या दौऱ्यावर गेली आहे. त्याचे फोटो तिने तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. शिवाय ती आपल्या व्हिडीओतून परदेश दौऱ्याची माहितीही देणार आहे.
अंकीता प्रभू वालावलकर हीने आपल्या परदेश दौऱ्याची माहिती देताना नवऱ्या बरोबरचा फोटो शेअर केला आहे. शिवाय एक छोटा व्हिडीओ ही तिने टाकला आहेत. त्यात ती आपण युरोप दौऱ्यावर जात असल्याचं सांगितलं आहे. तिचं विमान फ्रँकफर्डचं असल्याचंही त्या व्हिडीओत दिसत आहे. ती फ्रँकफर्डला उतरल्यानंतर आपण पुढे लक्झमबर्गला जाणार असल्याचं आपल्या चाहत्यांना सांगत आहे. शिवाय तिथले व्हिडीओ ही आपण बनवणार असल्याचं तिने या व्हिडीओत सांगितलं आहे. त्यामुळे अंकीता युरोपमधल्या आणखी कोणत्या देशात फिरणार आहे याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world