Asha Bhosle News: स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. संगीताचा एक सुवर्णकाळ हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत कित्येक दिग्गजांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनीही सोशल मीडियावर आशाताईंसोबतची खास आठवण शेअर केली आहे. आशाताईंचे साधेपण आणि त्यांच्यातील माया किती अफाट होती, याचा प्रत्यय देणारी एक पोस्ट डॉ. लहाने यांनी शेअर केली असून ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
तात्याराव लहाने यांची आशा भोसलेंबाबतची पोस्ट व्हायरल
आदरणीय आशाताई भोसले
आज आपल्यात नाहीत… ही बातमी मनाला खोलवर वेदना देऊन गेली.
ताईंसोबत माझे अतिशय जिव्हाळ्याचे नाते होते. त्या मला प्रेमाने “तात्या” म्हणायच्या. काहीही काम असले की स्वतः फोन करायच्या. दवाखान्यात आल्या की आमच्यासोबत मनमोकळ्या गप्पा, हशा आणि कधीतरी एखादे गोड गाणे… क्षण अक्षरशः सुवर्णमयी करून टाकायच्या.
एकदा त्यांच्या डोळ्यांवर छोटी शस्त्रक्रिया करण्याचा योग आला. नंतर त्यांच्या घरी भेटायला गेलो असता त्यांनी स्वतः बनविलेले पोहे प्रेमाने खाऊ घातले. डॉ. रागिनीला आत बोलावून सुंदर साडी दिली. मी सहज म्हणालो, “ताई, ऑपरेशन तर मी केले…” त्यावर त्या हसून म्हणाल्या, “चल तात्या, तुला पण साडी देते!” — एवढे साधेपण, एवढी माया!
कसलाही अहंकार नाही, कसलाही मोठेपणा नाही — फक्त निखळ प्रेम. इतके मोठे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे कठीण.
ताईंना भावपूर्ण आदरांजली.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना
(नक्की वाचा: Asha Bhosale Granddaughter: आशा भोसलेंची नात आहे बॉलिवूडची सुपरस्टार, 16व्या वर्षीच सलमान खानच्या सिनेमाची ऑफर)
डॉ. तात्याराव लहाने यांची पोस्ट
(नक्की वाचा: Zanai Bhosle: कोण आहे जनाई भोसले? आशा भोसलेंच्या नातीचं या क्रिकेटरसोबत आहे खास नाते, बॉलिवूड एण्ट्रीसाठी सज्ज)
इतकी मोठी व्यक्ती असूनही त्यांच्याकडे असलेले साधेपणा आणि निखळ प्रेम पाहून डॉक्टरही भारावून गेले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world