Bigg Boss 18 Salman Khan's Fees: बिग बॉसचे नवीन सीझन सुरू होताच सर्वप्रथम सलमान खानच्या मानधनाबाबत चर्चा केली जाते. सलमान खान किती मानधन घेत आहे? असा प्रश्न हमखास विचारला जातो. बिग बॉस 18साठीही सलमान खानने किती मानधन घेतले? हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. बिग बॉस सीझन 18चे ग्रँड प्रीमिअर रविवारी (6 ऑक्टोबर) दणक्यात पार पडले आणि दुसरीकडे सलमान खानच्या मानधनाबाबतची माहिती समोर आली आहे. यंदाच्या सीझनसाठी सलमान खानने मोठे मानधन घेतले आहे. विशेष म्हणजे सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या बॉक्सऑफिसवरील कमाईपेक्षाही यंदाच्या बिग बॉस सीझनचे मानधन अधिक असल्याचे म्हटले जात आहे. 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाचे कलेक्शन 182 कोटी रुपये इतके होते.
(नक्की वाचा: Bigg Boss 5 : सूरज चव्हाण ठरला बिग बॉसच्या 5 व्या सीजनचा विजेता)
बिग बॉस 18: सलमान खानचे मानधन किती?
सलमान खान बिग बॉस 18 होस्ट करण्यासाठी दर महिन्याला 60 कोटी रुपये इतके मोठे मानधन घेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या सीझनचे मानधन एपिसोडवर अवलंबून आहेत, यानुसार दरमहा जवळपास 60 कोटी रुपये इतकी फी होते. या सीझनचा कालावधी मागील सीझनप्रमाणे 15 आठवड्यांचा असेल, तर सलमान खान बिग बॉस 18 द्वारे जवळपास 250 कोटी रुपये कमावू शकतो.
(नक्की वाचा: सलमान खानच्या गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर ते लीड अॅक्ट्रेस... या अभिनेत्रीला ओळखलं का?)
सलमान खान या नावामुळे कार्यक्रमाचा टीआरपी देखील तितकाच वाढतो. दुसरीकडे यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धक देखील एकापेक्षा एक कमाल असल्याचे दिसत आहेत. यंदाच्या सीझनकडून बिग बॉसप्रेमी प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत कारण मागील सीझन तुलनेनं लोकप्रियतेच्या बाबतीत मागे पडले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world