जाहिरात

Bigg Boss Marathi 5 : शेवटी आलो, शेवटी जाणार... सूरज म्हणतोय,"ट्रॉफी मीच जिंकणार"

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठी 5मधील स्पर्धक सूरज चव्हाण त्याच्या एका विधानामुळे सोशल मीडियावर भलताच चर्चेत आला आहे.

Bigg Boss Marathi 5 : शेवटी आलो, शेवटी जाणार... सूरज म्हणतोय,"ट्रॉफी मीच जिंकणार"

Bigg Boss Marathi 5 : सोशल मीडिया स्टार अर्थात गोलीगत सूरज चव्हाणचा महाराष्ट्रामध्ये मोठा चाहतावर्ग आहे. एका अ‍ॅप्लिकेशनचे रेकॉर्ड मोडणारा मराठी मातीतला अस्सल स्टार सूरज चव्हाण आता 'बिग बॉस मराठी'चंही घर गाजवतानाही दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'चे घर, तिथले सदस्य, त्यांचं राहणीमान या सर्व गोष्टी सुरुवातीला सूरजसाठी खूप नव्या होत्या. त्यामुळे सुरुवातीचा एक आठवडा तो शांत होता. पण आता दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रभर त्याचा चांगलाच बोलबाला आहे.

(नक्की वाचा: हार्दिक पांड्याने केली नताशाची फसवणूक? या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चांना उधाण)

ट्रॉफीला मी कोणाला हात लावू देणार नाही - सूरज

सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा खेळ त्याच्या गोलीगत स्टाईलने खेळत आहे. आजच्या भागात सूरज चव्हाण अभिजीत सावंतला सांगत आहे की,"बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी मीच नेणार". त्यावर अभिजीत त्याला म्हणतो,"तुझा हक्क आहे". सूरज म्हणतो,"बिग बॉस मराठी'च्या ट्रॉफीला मी कोणाला हात लावू देणार नाही". अभिजीत सूरजला म्हणतो,"शेवटून पहिला आहेस तू". त्यावर सूरज म्हणतो,"शेवटी आलो... शेवटीच जाणार". यावर अभिजीत म्हणतो,"तू जिंकलास तर आम्हालाही आनंद होईल". 

(नक्की वाचा: सनी देओलच्या प्रेमात पडली होती ही प्रसिद्ध गायिका, भर कार्यक्रमात दिली कबुली)

गोलीगत सूरज चव्हाण त्याच्या स्टाईलने खेळून 'बिग बॉस मराठी'च्या प्रेक्षकांची मने जिंकत आहे. त्याचा खेळीचे सर्वत्र चांगलच कौतुक होत आहे.

सूरजची डान्स करण्याची अनोख पद्धतही खूप प्रसिद्ध झाली आहे. अक्षय कुमारने आणि रितेश देशमुखलाही त्याचा झापुकझुपूक डान्स खूप आवडला.

(नक्की वाचा: ऐश्वर्या रायपासून वेगळे होण्याच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडले मौन, घटस्फोटाबाबत अखेर सांगितले सत्य)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
सनी देओलच्या प्रेमात पडली होती ही प्रसिद्ध गायिका, भर कार्यक्रमात दिली कबुली
Bigg Boss Marathi 5 : शेवटी आलो, शेवटी जाणार... सूरज म्हणतोय,"ट्रॉफी मीच जिंकणार"
pushpa actress samantha ruth prabhu dating the family man director raj nidimoru know the truth
Next Article
Ex Husband च्या साखरपुड्यानंतर समांथाही पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा, चाहत्यांनी जाहीर केली नाराजी