जाहिरात

होय मला ती आवडत होती! तिच्यासाठी मी योगा क्लासला जायचो; सलमान खानची कबुली

Bigg Boss या शोचे सूत्रसंचालन सलमान खान करत होता. या कार्यक्रमात बोलताना सलमानने सांगितले की त्याला एक अभिनेत्री प्रचंड आवडत होती . फक्त तिला पाहाता यावे यासाठी आपण योगा क्लासही लावला होता, कारण ती योगा शिकवायची असे सलमानने म्हटले आहे. आपण मोठे झाल्यानंतर तिच्याशीच लग्न करणार आहोत असेही सलमानने त्याच्या घरच्यांना सांगितले होते.

होय मला ती आवडत होती! तिच्यासाठी मी योगा क्लासला जायचो; सलमान खानची कबुली
मुंबई:

सलमान खानने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवता क्षणी तो लाखो तरुणींच्या हृदयाचा ठाव घेऊन गेला होता. मात्र हे फार कमी लोकांना ठावून आके की त्याचे हृदय एका अभिनेत्रीने चोरले होते. ती अभिनेत्री त्याला इतकी आवडत होती की सलमानने त्याच्या घरी सांगून टाकले होते की मी तिच्याशीच लग्न करेन. ज्या अभिनेत्रीला पाहून सलमान घायाळ झाला होता, त्या सदाबहार अभिनेत्रीने अनेक दशके चित्रपटसृष्टीवर राज्य केले होते. ही अभिनेत्री फक्त दिसायलाच सुंदर नव्हती तर ती संवादफेक, अभिनय सगळ्याच बाबतीत अप्रतिम होती. 

नक्की वाचा : हिंदी बिग बॉसच्या 18व्या सीझनची प्रतीक्षा संपली, या दिवशी होणार ग्रँड प्रीमिअर

2014 साली Bigg Boss च्या एका कार्यक्रमामध्ये सलमान खानने आपल्या आठवणींना उजाळा दिला होता. त्याने आपल्या आवडत्या अभिनेत्रीला पाहण्यासाठी कायकाय उपदव्याप केले हे या शोमध्ये सांगितलं होतं. 'सुपर नानी' नावाचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटात श्रेया नारायण, श्वेता कुमार, आंचल द्विवेदी, वर्षा उसगांवकर, रेखा याारख्या अभिनेत्रींची भूमिका होती. या चित्रपटाची कास्ट बिग बॉसमध्ये आली होती.  यावेळी सलमानने त्याच्या लहानपणच्या काही आठवणी सांगितल्या होत्या. 

नक्की वाचा : ऐश्वर्या राय वयाच्या 80व्या वर्षी दिसेल अशी! चेहऱ्यावर सुरकुत्या तरीही म्हणाल सुंदरी

सलमानने त्या दिवसांची आठवण काढत म्हटले की "उस वक्त योगा से तो मेरा कोई कनेक्शन थाही नही पर क्यूंकी रेखा जी वहां पे सिखाती थी योगा, मैं और मेरे दोस्त पहुंच जाया करते थे"

सलमानने सांगितलं की तो लहान असताना तो योगा क्लासला जात होता. आणि तिथे रेखा योगाचे धडे शिकवायची. त्यावेळी सलमान 7-8 वर्षांचा होता. मी त्याकाळी रेखा यांचा सायकलवरून पाठलाग करायचो असं सलमानने म्हटलंय. रेखाच्या प्रेमात आकंठ बुडालो असल्याने मी घरी जाऊन सांगितलं होतं की, मी मोठा झाल्यानंतर लग्न करेन तर फक्त रेखा हिच्याशीच. यानंतर सलमानने गंमतीने म्हटले की कदाचित म्हणून माझं आजपर्यंत लग्न झालं नाही. रेखा यांनी सलमानच्या या विधानावर गंमतीने म्हटलं की कदाचित म्हणूनच माझेही लग्न झाले नाही.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
99 लाख वेटिंग, 10 लाख तिकीट! काय आहे Coldplay ज्यासाठी भारतीय फॅन्स करतायत पाण्यासारखा पैसा खर्च
होय मला ती आवडत होती! तिच्यासाठी मी योगा क्लासला जायचो; सलमान खानची कबुली
ajay-devgan-biggest-flop-auron-mein-kahan-dum-tha-box-office-failure
Next Article
'या' चित्रपटामुळे अजय देवगणला बसला जोरदार धक्का, 100 कोटीच्या चित्रपटाने कमावले फक्त...