जाहिरात

दिव्या-अपूर्व हनीमूनहून परतताच सुरु झाली घटस्फोटाची चर्चा, काय आहे कारण?

दिव्याने निखीलसोबतचे भूटानमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र हनिमूनवरुन परतताच दिव्याने आपले लग्नाचे फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केले आहेत.

दिव्या-अपूर्व हनीमूनहून परतताच सुरु झाली घटस्फोटाची चर्चा, काय आहे कारण?

सेलिब्रिटी कपल्स हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सेलिब्रिटीचं लग्न असो की त्यांचा घटस्फोट याबाबत अनेकांना उत्सुकता असते. हार्दिक-नताशा आणि दलजीत कौर-निखील पटेल यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. अशातच आता दिव्या अग्रवाल देखील चर्चेत आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दिव्या अग्रवाल बिग बॉस ओटीटी सीजन-1 ची विजेती आहे. दिव्याने नुकतेच तिचा बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकर जो एक बिझनेसमन आहे त्याच्यासोबत लग्न केलं होतं. काही दिवसांपूर्वीच दोघे हनिमूनसाठी गेले होते. मात्र आता अशा चर्चा आहेत की दिव्या आणि अपूर्व वेगळे होऊ शकतात. असं काय झालं की दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

(नक्की वाचा- मुनव्वर फारूकीनं केलं दुसरं लग्न, पाहा कोण आहे नवी बेगम महजबीन कोटवाला)

दिव्या आणि अपूर्व नुकतेच भूटानमधून परतले. दिव्याने निखीलसोबतचे भूटानमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र हनिमूनवरुन परतताच दिव्याने आपले लग्नाचे फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केले आहेत. दिव्याच्या या कृतीमुळे तिचे फॅन्स हैरान आहेत.

काहीजण दिव्या आणि अपूर्व घटस्फोट घेणार की काय असा सवाल करत आहेत. मात्र हा पब्लिसिटी स्टंट असू शकतो, अशी शक्यता देखील नेटिझन्स वर्तवत आहेत. मात्र यामागचं खरं कारण काय आहे हे दिव्या आणि अपूर्व हेच सांगू शकतात. 

( नक्की वाचा : हार्दिक पांड्याची पत्नी नताशाला घटस्फोटानंतर 70 टक्के संपत्ती मिळणार? वाचा काय आहे कायदा )

अपूर्वसोबत लग्न करण्यापूर्वी दिव्या वरुण सूदसोबत रिलेशनमध्ये होती. वरुणसोबत ब्रेकअपनंतर दिव्या आणि अपूर्व एकत्र आले होते. त्यानंतर दोघांनी 20 फेब्रुवारी 2024 मध्ये लग्न केले होते. मात्र अवघ्या तीन महिन्यातच दोघांच्या वेगळं होण्याची चर्चा सुरु झाली आहे.     

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com