जाहिरात

मी पॅरालायज्ड झालेय? खरंच? हसणं-बोलण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचा आलिया भटने असा घेतला समाचार

Alia Bhatt: सर्जरी आणि बोटॉक्सवरून ट्रोल करणाऱ्यांचा आलिया भटने चांगलाच समाचार घेतला आहे.

मी पॅरालायज्ड झालेय? खरंच? हसणं-बोलण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचा आलिया भटने असा घेतला समाचार

Alia Bhatt: सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटशी संबंधित काही व्हिडीओ आणि काही लेख व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये आलियाच्या चेहऱ्यासह तिच्या शरीरासंदर्भात वेगवेगळ्या टीका-टिप्पणी करण्यात आल्या आहेत. काही लोकांनी म्हटले की, आलियाने बोटॉक्स केले आहे. पण तिची ट्रीटमेंट चुकीचे झाल्याने चेहरा बिघडला आहे. तर काहींनी म्हटलंय की, आलियाच्या चेहऱ्याच्या एका बाजूला लकवा मारला आहे. अशा पद्धतीच्या व्हिडीओमुळे आलिया संतापल्याचे दिसत आहे. सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर तिने स्टोरी पोस्ट करत आपला राग व्यक्त केला आणि ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देखील दिलंय. 

आलिया भटने मोठी पोस्ट लिहून आपला राग व्यक्त केला आहे. आलियाने नेमके काय म्हटलंय ते पाहुया....

"जे लोक आपल्या शरीरासाठी कॉस्मेटिक करेक्शन किंवा एखाद्या सर्जरीची निवड करतात, त्या लोकांप्रति माझे कोणतेही जजमेंट नाही. शरीर तुमचे आहे तर निर्णय देखील तुमचाच असला पाहिजे. पण वाह! हे तर हास्यास्पद गोष्टीपलिकडील आहे. काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये असा दावा करण्यात येत आहे की, मी बोटॉक्स केले पण त्याचे चुकीचे परिणाम झाले. (काही क्लिकबेट लेखही चालवले जाताहेत). ज्यामध्ये तुमच्यानुसार असे म्हटले गेलेय की माझे हसणे व्यवस्थित नाही, माझी बोलण्याची पद्धत विचित्र आहे. हे म्हणजे चेहऱ्यावरील बारीकसारीक दोष शोधून काढण्यासारखे आहे. कोणत्याही पुराव्याशिवायच हा अतिशय गंभीर दावा करण्यात आला आहे". 

(नक्की वाचा: पप्पा की मम्मा? आलियाने सांगितलं राहाने आधी कोणता शब्द उच्चारला)

का करताय हे सर्व? आलियाचा सवाल

आलियाने पुढे असेही म्हटलंय की, "सर्वात वाईट बाब म्हणजे तुम्ही तरुणांनाही भरकटवत आहात, जे तुम्ही केलेले दावे खरे मानत आहेत. का करताय तुम्ही असे? केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी? कारण याने काहीही अर्थ साध्य होत नाही. यासारख्या वायफळ गोष्टींवरुन महिलांप्रति मत तयार केले जाते आणि आमचा चेहरा, शरीर, खासगी आयुष्य इतकंच काय तर आमच्या पार्श्वभागावरून आमच्यावर टीका केली जाते. मायक्रोस्कोपद्वारे निरीक्षण करण्याऐवजी प्रत्येकाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आपण स्वीकारले पाहिजे".

(नक्की वाचा: आलियाने शेअर केले रणबीरच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो, राहाने वेधले लक्ष)

शेवटी आलियाने असे लिहिलंय की, "अतिशय दुःखाची बाब म्हणजे महिलेसाठी एका महिलेकडूनच या सर्व गोष्टी म्हटल्या जात आहेत. 'जगा आणि जगू द्या' या धोरणाचे काय झालं? कोणाला स्वतःच्या हिशेबाने जगण्याचा हक्क नाहीय? आपल्याला एकमेकांचा अपमान करण्याची इतकी सवय लागली आहे की या सर्व गोष्टी अगदी सामान्य वाटतात."

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Alia Bhatt Instagram

(नक्की वाचा: आलिया भटची लाडकी लेक राहाने घातलेला ड्रेस आहे इतका महागडा)

काही दिवसांपासून आलिया भटच्या चेहऱ्याच्या हावभावांशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये लोक तिच्या गालावरील खळीपासून ते तिच्या बोलण्याच्या पद्धतीवर भाष्य करत असल्याचे दिसत आहे. यावरच आलियाने संताप व्यक्त केला आहे.   
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com