जाहिरात

45 कोटींचा खर्च, मिळाले फक्त 60 हजार; बॉलीवूडचा महाफ्लॉप चित्रपट कोणता आहे ओळखा पाहू

Bollywood's Biggest Flop: या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केले होते.

45 कोटींचा खर्च, मिळाले फक्त 60 हजार; बॉलीवूडचा महाफ्लॉप चित्रपट कोणता आहे ओळखा पाहू
मुंबई:

बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, जे तयार करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला होता, मात्र बॉक्स ऑफिसवर ते अत्यंत सुमार कामगिरी करणारे ठरले. याउलट काही चित्रपट असे असतात की जे बनविण्यासाठी फार पैसा खर्च करण्यात आला नसतो मात्र ते इतके चालतात की ब्लॉकबस्टर होतात. मात्र अनेकांना प्रश्न पडतो की बॉलीवूडचा महाफ्लॉप चित्रपट कोणता ? हा चित्रपट फार जुना नाहीये 2 वर्षांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. आणि यातील अभिनेत्री ही उत्तम काम करणारी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे मात्र ती देखील या चित्रपटाची सुमार कामगिरी थांबवू शकली नाही. हा चित्रपट तब्बल 45 कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आला होता. हा चित्रपट कधी आला, कधी गेला हे ना प्रेक्षकांना कळालं ना चित्रपटप्रेमींना ना चित्रपट समीक्षकांना.  

( नक्की वाचा: स्मृती इराणींच्या पतीचे 10 फोटो, पाचवा पाहून म्हणाल: तुलसीच्या Reel Life मिहिरलाही टाकलं मागे )

'द लेडी किलर' हा चित्रपट 2023 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर ही प्रमुख भूमिकेत होती. अभिनेता म्हणून या चित्रपटात अर्जुन कपूर याला घेण्यात आले होते. अर्जुन कपूर हा ठोकळा असून सुमार अभिनेता आहे अशी टीका अनेक चित्रपटप्रेमी सातत्याने करत असतात. या चित्रपटाचे नाव 'द लेडी किलर' असे ठेवण्यात आले खरे बॉक्स ऑफीस कमाईबाबत हा चित्रपट गतप्राण झाल्याचे दिसून आले. हा चित्रपट चित्रपट सृष्टीतील आजवरचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट मानला जातो. याचे कारण म्हणजे या चित्रपटाचे बजेट 45 कोटी रुपये होते, पण त्याने फक्त 60 हजार रुपयांची कमाई केली.

( नक्की वाचा: शाहरुख खानच्या 'जवान'वर अहान पांडेचा 'सैय्यारा' पडला भारी, IMDb रेटिंग पाहून हैराण व्हाल! )

 'द लेडी किलर' या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केले होते. दिग्दर्शनासोबतच त्यांनी या चित्रपटाची कथाही लिहिली होती. पवन सोनी आणि मयंक तिवारी यांनी पटकथेवर त्यांच्यासोबत काम केलं होतं.  हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटाची फक्त 293 तिकिटे विकली गेली होती. दिवसअखेरपर्यं हा आकडा 500 तिकिटांपर्यंत पोहोचला. त्यानंतर चित्रपटगृहांमधून हा चित्रपट काढून टाकण्यात आला. हिंदुस्थान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com