जाहिरात

रजनीकांत यांचा 'कुली' वि. हृतिक, ज्यु.एनटीआर यांचा 'वॉर-2', युद्धात कोण मारतंय बाजी?

Coolie box office collection day 1: चित्रपटाची रजनीकांत यांच्या चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती.

रजनीकांत यांचा 'कुली' वि. हृतिक, ज्यु.एनटीआर यांचा 'वॉर-2', युद्धात कोण मारतंय बाजी?
मुंबई:

सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित 'कुली' (Coolie) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली आहे. दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटाची रजनीकांत यांच्या चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी, म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी, बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत ह्रितिक रोशन आणि ज्युनियर NTR यांच्या 'वॉर 2' (War 2) चित्रपटाला मागे टाकले आहे. Sacnilk या वेबसाईटवर चित्रपटाने प्रत्येक दिवशी बॉक्स ऑफीसवर कशी कामगिरी केली याचा तपशील प्रसिद्ध केला जातो. या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी संध्याकाळपर्यंत 'कुली'ने 'वॉर 2' ला बरेच मागे टाकले होते.  'कुली' च्या या कामगिरीमुळे तमिळ चित्रपटसृष्टी खूश झाली आहे. या चित्रपटाने हिंदीमध्येही चांगली कामगिरी केल्याचे दिसून येत आहे.  

( नक्की वाचा: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या कारला अपघात, Cityflo बसची जबर धडक )

कुली आणि वॉर-2 ने बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवला? (Coolie vs War 2 Box Office Collection)

Sacnilk च्या आकडेवारीनुसार, गुरुवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 'कुली'ने भारतात 35.51 कोटींची कमाई केली होती. गुरुवारी कुली आणि वॉर2 हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले होते. यामुळे या दोन चित्रपटांच्या बॉक्स ऑफीसवरील युद्धात कोण बाजी मारणार अशी उत्सुकता निर्माण झाली होती. गुरुवारी संध्याकाळपर्यंत 'वॉर 2' ने 21.42 कोटींची कमाई केली होती.  या आकडेवारीवरून 'कुली'ची कमाई वॉर 2 पेक्षा  14 कोटींनी जास्त असल्याचे दिसून आले आहे. कुली हा चित्रपट मूळ तमिळ भाषेत निर्मित करण्यात आला असून तो तेलुगू आणि हिंदीमध्ये डब करण्यात आला आहे. या तीनही भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या कुली चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय.  

( नक्की वाचा: मृणाल ठाकूरने टॉपच्या अभिनेत्रीची खिल्ली उडवली, VIDEO व्हायरल; अभिनेत्रीचंही जशास तसं उत्तर )

यंदाचा 15 ऑगस्ट रजनीकांत यांच्यासाठी स्पेशल का आहे ?

15 ऑगस्ट हा दिवस रजनीकांत आणि त्यांचा कुली चित्रपट या दोघांसाठी विशेष असणार आहे. रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीतील पन्नाशी 15 ऑगस्ट 2025 रोजी होत आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाची सुट्टी आहे, त्यानंतर शनिवार, रविवार असा लाँग वीकएंड आल्याने हा चित्रपटया तीन दिवसांत धमाकेदार कमाई करेल अशी अपेक्षा आहे. या तीन दिवसांत वॉर-2 कशी कामगिरी करतो ते देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. रजनीकांत हे 15 ऑगस्ट रोजी चित्रपटसृष्टीतील पन्नाशी साजरी करत असल्याने त्यांना कमल हसन, ह्रितिक रोशन, शिवकार्तिकेयन, उदयनिधी स्टालिन, मोहनलाल, मामूट्टी, नानी अशा अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे निर्मिती दरम्यानचे काही फोटो शेअर करत, "कुली माझ्या प्रवासातील नेहमीच एक खास चित्रपट राहील" असे म्हटले आहे. कुली चित्रपटात रजनीकांत यांच्याव्यतिरिक्त नागार्जुन, सौबिन शाहिर, श्रुती हसन, सत्यराज, उपेंद्र आणि आमिर खान यांच्यासारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सन पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटाला संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com