जाहिरात

मृणाल ठाकूरने टॉपच्या अभिनेत्रीची खिल्ली उडवली, VIDEO व्हायरल; अभिनेत्रीचंही जशास तसं उत्तर

सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, मृणाल ठाकूर तिच्या 'कुमकुम भाग्य' या मालिकेतील सह-अभिनेता अर्जित तनेजा सोबत फिटनेसबद्दल बोलताना दिसत आहे. 

मृणाल ठाकूरने टॉपच्या अभिनेत्रीची खिल्ली उडवली, VIDEO व्हायरल; अभिनेत्रीचंही जशास तसं उत्तर

अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या एका जुन्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. तिचा 'सन ऑफ सरदार 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलिज झाला असतानाच, दक्षिणेतील सुपरस्टार धनुषसोबतच्या तिच्या कथित नात्यामुळेही ती चर्चेत आहे. मात्र, आता एका जुन्या व्हिडिओमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे, ज्यात ती अभिनेत्री बिपाशा बसू हिच्यावर टीका करताना दिसत आहे.

'मी बिपाशापेक्षा सरस आहे'

सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, मृणाल ठाकूर तिच्या 'कुमकुम भाग्य' या मालिकेतील सह-अभिनेता अर्जित तनेजा सोबत फिटनेसबद्दल बोलताना दिसत आहे. अर्जितने मृणालला सांगितले की तो बिपाशाचा फॅन आहे. तेव्हा तिने उत्तर दिले, "तुला अशा मुलीशी लग्न करायचे आहे जिचे मॅनली मसल्स आहेत.  "तुला मॅनली मसल्स असलेल्या तरुणीशी लग्न करायला आवडेल का?" यावर अर्जीतने 'टोन्ड फिजीक' असलेली पार्टनर आवडेल असे उत्तर दिले.

(नक्की वाचा-  Prajakta Mali : प्राजक्ता माळी पोहोचली येरवडा तुरुंगात; कारण वाचून म्हणाल, वाह ताई वाह!)

तेव्हा मृणाल म्हणाली, "मग बिपाशाशीच लग्न कर. ऐक, मी बिपाशापेक्षा खूप सरस आहे." तिच्या या 'मी बिपाशापेक्षा सरस आहे' या वक्तव्यामुळे इंटरनेटवर तिच्यावर जोरदार टीका होत आहे. इतर अभिनेत्रीला कमी लेखल्याबद्दल नेटिझन्सनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे.

नेटिझन्सचा निशाणा

एका युजरने म्हटले की, "तिने म्हटले की ती बिपाशापेक्षा सरस आहे. ती बिपाशाच्या जवळपासही नाहीये." अन्य काही कमेंट्समध्ये लोकांनी म्हटलं की, "चांगले झाले तिचे खोटेपण बाहेर आले. मला तिच्याकडून कधीच चांगल्या भावना आल्या नाहीत आणि लोक तिला का पसंत करतात, हे मला समजत नाही. ती चांगली अभिनेत्री नाही, फक्त ठीकठाक आहे."

(नक्की वाचा-  सेलिब्रिटी लाईफस्टाईल, लाखो फॉलोअर्स, मात्र काम.. ED ने इन्फ्लुएन्सर संदीपा विर्कला का केली अटक?)

Latest and Breaking News on NDTV

बिपाशा बसूचं प्रत्युत्तर

बिपाशा बसूने नुकतीच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट मृणाल ठाकूरच्या वक्तव्यावर एक अप्रत्यक्ष उत्तर असल्याचे मानले जात आहे. बिपाशाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मजबूत महिला एकमेकींना वर आणतात. सुंदर स्त्रियांनो, ते मसल्स कमवा... आपण मजबूत असले पाहिजे... मसल्स तुम्हाला चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य देतात. महिला मजबूत दिसू नये किंवा शारीरिकदृष्ट्या मजबूत नसाव्यात, या जुन्या विचारसरणीला झुगारून द्या!" बिपाशाने या पोस्टमध्ये मृणाल ठाकूरचे नाव घेतलेले नाही. मात्र, तिच्या पोस्टमधील 'स्ट्राँग मसल्स' शब्द मृणालच्या 'मॅनली मसल्स' या टीकेलाच उत्तर असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com