Smriti Mandhana And Palash Muchhal Wedding Called Off: टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना मागील काही आठवड्यांपासून खासगी जीवनामुळे चर्चेत आहे. 7 डिसेंबर रोजी स्वतःच्या लग्नाबाबत अखेर तिने मौन सोडलंय. पलाश मुच्छलसोबतचं लग्न मोडल्याची माहिती स्वतः स्मृतीने सोशल मीडियाद्वारे दिलीय. संगीत सोहळ्यापासून लग्न पुढे ढकल्यानंतर अनेक अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या, त्या सर्व चर्चांना स्मृतीनेआता पूर्णविराम दिलाय. पण प्रपोजलपासून ते लग्न मोडण्याच्या दिवसापर्यंत नेमके काय-काय घडलं ते जाणून घेऊया...
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलची लव्हस्टोरी कशी सुरू झाली?
स्मृती आणि पलाश वर्ष 2019 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. एका मित्रामुळे दोघांचीही मुंबईमध्ये भेट झाली होती आणि यानंतर त्यांच्यात पक्के नाते निर्माण झाले. दोघंही आपापल्या क्षेत्रामध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत. स्मृती मानधना भारतीय महिला क्रिकेट टीममधील स्टार बॅटर तर पलाश बॉलिवूडमधील संगीतकार आहे. या दोघांनीही सुरुवातीस त्यांचे नातं गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला, कित्येक वर्षे प्रसिद्धी माध्यमांपासून नातं दूर ठेवलं. शांतपणे दोघांनीही आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले. जुलै 2024मध्ये त्यांच्या नात्याला पाच वर्षे पूर्ण झाली, यानिमित्ताने सोशल मीडिया पोस्टद्वारे नात्याबाबतची माहिती जाहीर केली. याद्वारे त्यांनी नवीन आयुष्यास शुभारंभ करत असल्याचे संकेत दिले होते.
(नक्की वाचा: Smriti Mandhana News: लग्न मोडलं... विषय संपवायचाय... स्मृती मानधनाने सोशल मीडियावर शेअर केली पहिली पोस्ट)
पलाश मुच्छलने DY पाटील स्टेडिअममध्ये स्मृती मानधनाला केले प्रपोज
पलाश मुच्छलने क्रिकेटर स्मृती मानधना नोव्हेंबर महिन्यात नवी मुंबईतील DY पाटील स्टेडिअममध्ये लग्नासाठी प्रपोज केले. याच मैदानात भारतीय महिला टीमने वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली होती, म्हणूनच ही जागा प्रपोज करण्यासाठी खास होती. स्मृतीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून पलाशने तिला मैदानात आणलं, गुडघ्यावर बसून अंगठी घातली आणि लग्नासाठी प्रपोज केलं. पलाशने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. याआधी स्मृतीनेही लग्नसोहळ्याची माहिती देणारा गंमतीशीर व्हिडीओ पोस्ट केला होता.
(नक्की वाचा: Smriti Mandhana News: लग्न मोडण्यासह स्मृती मानधनाने पलाश आणि पलक मुच्छलबाबत घेतला आणखी एक मोठा निर्णय)
पलाश मुच्छलचा स्मृती मानधनासाठी खास 'SM18' टॅटू
पलाश मुच्छलने स्मृती मानधनासाठी आपल्या हातावर 'SM18' असा खास टॅटू काढला होता. "SM" म्हणजे स्मृती मानधना आणि 18 हा तिच्या जर्सीचा नंबर आहे. नोव्हेंबर 2025मध्ये भारताच्या महिला क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यानं हा टॅटू काढला होता.

Photo Credit: Palash Muchhal Instagram
स्मृतीच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये केलं दाखल
स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास यांची संगीत सोहळ्यादरम्यान अचानक प्रकृती खालावली. तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि स्मृती-पलाशचं लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं. स्मृती आणि पलाशचं लग्न 23 नोव्हेंबर रोजी होणार होतं.
स्मृती मानधनाने लग्नाशी संबंधित फोटो-व्हिडीओ केले डिलिटलग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मानधनाने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून लग्नाशी संबंधित सर्व फोटो आणि व्हिडीओ डिलिट केले. पण दोन्ही कुटुंबीयांकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आल्या नव्हत्या. दुसरीकडे स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे लग्न पुढे ढकलल्याची माहिती पलाशची बहीण पलक मुच्छलने दिली होती.
सोशल मीडियावरील अफवायानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा आणि अफवा पसरणं सुरू झाले. पलाशचे कथित स्वरुपात दुसऱ्या तरुणींसोबतचे चॅट्स, एक्स गर्लफ्रेंडसोबतचे फोटो व्हायरल होऊ लागले आणि वेडिंग कोरिओग्राफरसोबतच्या संबंधांबाबतची अफवाही पसरू लागली.
पलक मुच्छलचा मीडियासोबतचा संवादनुकतेच पलक मुच्छलने एका मुलाखतीत सांगितलं की, दोन्ही कुटुंबांसाठी अतिशय कठीण वेळ आहे आणि यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Photo Credit: Smriti Mandhana Instagram
आता पुढे जाण्याची वेळ आलीय: स्मृती मानधनास्मृती मानधनाने 7 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की,"मागील काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहेत आणि आता मी बोलणं महत्त्वाचं आहे, असे मला वाटतंय. मी माझ्या गोष्टी अतिशय खासगी ठेवते आणि मला माझे व्यक्तिमत्त्व असंच ठेवायचंय, पण मी हे स्पष्ट करू इच्छिते की लग्न रद्द करण्यात आलंय. हा विषय येथेच संपवू इच्छिते. दोन्ही कुटुंबीयांच्या प्रायव्हसीचा आदर करावा. आपणा सर्वांसमोर एक मोठे उद्देश आहे, असे मला वाटतं आणि देशाचे सर्वोच्च स्तरावर कायम प्रतिनिधित्व करणं, हे माझे उद्देश आहे. जोवर शक्य आहे तोवर मला भारत देशासाठी खेळायचंय, ट्रॉफी जिंकत राहायचंय आणि हेच माझं लक्ष्य असेल. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी,सर्वांचे आभार. आता पुढे जाण्याची वेळ आलीय."

Photo Credit: Palash Muchhal Instagram
पलाश मुच्छलनेही शेअर केली पोस्टपलाश मुच्छलनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय, त्याने म्हटलंय की, "आयुष्यात मी पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नात्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतलाय. माझ्यासाठी सर्वात पवित्र असलेल्या गोष्टीबद्दलच्या निराधार अफवांवर लोक इतक्या सहजपणे प्रतिक्रिया व्यक्त करतायेत हे पाहणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ आहे आणि मी त्याचा सामना करेन. एक समाज म्हणून कोणतीही गोष्ट पडताळून न पाहता एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज करून घेणे थांबवायला हवं. आपले शब्द जखमा देऊ शकतात, जे आपण कधीच समजू शकणार नाही. माझी टीम खोटी आणि बदनामीकारक माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करेल. या कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आभार.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
