
Amitabh Bachchan News: हिंदी सिनेसृष्टीकरिता फिल्मफेअर पुरस्कार अतिशय महत्त्वाचे मानले जातात. मागील सात दशकांपासून या पुरस्कारांचे वितरण केले जात आहे. नुकतेच 11 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील अहमदाबाद शहरामध्ये 70व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बच्चन कुटुंबीयांसाठी (Bachchan Family) यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा संस्मरणीय ठरलाय, कारण अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि जया बच्चन या तिघांनाही सोहळ्यात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट शेअर केलीय.
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बच्चन कुटुंबीयांचा दबदबा
2025च्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेता अभिषेक बच्चनला 'आय वाँट टू टॉक' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांना सिनेआयकॉन या पुरस्काराने गौरवण्यात आले. यानुसार यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये बच्चन कुटुंबीयांचा दबदबा पाहायला मिळाला.
बिग बींनी शेअर केली खास पोस्ट
'एक परिवार.. एकाच कुटुंबाचे तीन सदस्य....तिघांचाही एकच व्यवसाय... आणि एकाच दिवशी तीन पुरस्कार' अशा कॅप्शनसह अमिताभ बच्चन यांनी पुरस्कारांचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केलाय. बिग बींच्या या पोस्टवर लोकांनी कौतुक, अभिनंदनाचा वर्षाव केलाय तर काहींनी नाराजीही व्यक्त केलीय.
ऐश्वर्या रायचा पोस्टमध्ये उल्लेख नाही, नेटकरी भडकले,म्हणाले...
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये ऐश्वर्या रायचा उल्लेख न केल्याने नेटकऱ्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यास सुरुवात केली. काही नेटकऱ्यांच्या कमेंट्स जाणून घेऊया...
anuramujumdar नावाच्या युजरने म्हटलंय की, "सर तुम्ही विसरलात का तुमची सून ऐश्वर्या राय देखील अभिनेत्री आहे? अभिनेत्री म्हणून तिच्यातील अद्भुत कौशल्यांबाबतही मी बोलतच नाहीय, कृपया तिच्याशी वाईट वागू नका..."

Photo Credit: Amitabh Bachchan Instagram
rafeya_chy नावाच्या युजरने म्हटलंय की, "ऐश्वर्या या कुटुंबासाठी कोणी नाहीय, हे आता समजलं".

Photo Credit: Amitabh Bachchan Instagram
growwithgauriii या युजरने म्हटलंय की, "ऐश्वर्या? तुम्ही तिचा उल्लेख कसा करत नाहीय? ती तुमच्या कुटुंबाचा भाग नाही?"

Photo Credit: Amitabh Bachchan Instagram
prerna_bindhuriने लिहिलंय की, "सदस्य तर चार आहेत, जे एकाच व्यवसायात आहे, कदाचित तुम्ही ऐश्वर्याला विसरलात..."

Photo Credit: Amitabh Bachchan Instagram
prajnyaniinsight ने कमेंट केलीय की, " सगळं ठीक आहे, पण ऐश्वर्याचा उल्लेख कुठेच का नाहीय?"

Photo Credit: Amitabh Bachchan Instagram
"तुम्ही ऐश्वर्याला फॉलो कधी करणार?", असा वेगळाच मुद्दा dr.tilu नावाच्या युजरने उपस्थिती केलाय.

Photo Credit: Amitabh Bachchan Instagram
"फिल्मफेअर पुरस्कार 2025 सोहळ्यामध्ये केवळ जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचा सन्मान करण्यात आला, त्यामुळे ऐश्वर्या रायच्या नावाचा उल्लेख केला नाही"; असं म्हणत काही नेटकऱ्यांनी बिग बींना पाठिंबा दर्शवलाय.
(नक्की वाचा: VIDEO: 'मला नियम शिकवू नका', चिमुकल्याचा अमिताभ बच्चन यांच्याशी उद्धटपणा; नेटकऱ्यांचा संताप)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world