
Operation Sindoor Updates: भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठे दहशतवादी मारले गेल्याची महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे. 8 मे च्या रात्री भारतीय लष्कराकडून पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात लश्कर, जैश आणि हिजबुल मुजाहिदीनचे दहशतवादी तळे नष्ट करण्यात आली. या कारवाईत भारताला हवा असलेला मोठा दहशतवादी ठार झाला असून भारताविरुद्ध रचलेल्या मोठ्या कटानंतर तब्बल 26 वर्षांनी बदला पूर्ण झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यामध्ये खात्मा झालेला मोठा दहशतवादी म्हणजे मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्ताद जी मोहम्मद सलीम उर्फ घोसी साहब. मोहम्मद युसूफ अझहर हा जैस ए मोहम्मद संघटनेशी संबंध होता. तसेच तो मौलाना मसूद अझहरचा मेहुणा होता. मोहम्मद अझहरने जैश-ए-मोहम्मदसाठी शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेतले. जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये तो सहभागी होता. तसेच आयसी 814 या विमान अपहरणातील भारतातील हवा असलेलाही तो मुख्य दहशतवादी हल्ला होता.
काय होते कंदहार हायजॅकची स्टोरी?
इंडियन एअरलाइन्सचे एअरबस 300 विमान क्रमांक IC-814 हे काठमांडू,नेपाळ येथून दिल्लीसाठी उड्डाण करत होते. 24 डिसेंबर 1999 रोजी दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण केले. दहशतवाद्यांनी पायलट कॅप्टनला विमान लाहोरला घेऊन जाण्यास सांगितले. जेव्हा तिथे लँडिंगची परवानगी देण्यात आली नाही, तेव्हा विमान अमृतसरमध्ये उतरले, परंतु नंतर तेथून विमान दुबईला उड्डाण करण्यात आले. दुबईमध्ये 27 प्रवाशांना सोडण्यात आले. यानंतर विमान कंधारला पोहोचले.
( नक्की वाचा : IPL 2025: कधी आणि केंव्हा होणार उर्वरित सामने? वाचा सर्व अपडेट )
प्रवाशांना सोडण्यासाठी दहशतवाद्यांनी जैशचे शीर्ष दहशतवादी मसूद अझहर, मुश्ताक अहमद जरगर आणि अहमद उमर सईद शेख यांची सुटका करण्याची मागणी केली. शेवटी सरकारला या तिन्ही दहशतवाद्यांना सोडावे लागले. भारत सरकारने तालिबानच्या मध्यस्थीने दहशतवाद्यांशी वाटाघाटी केल्या होत्या. सुटका झालेला दहशतवादी मसूद अझहर भारतासाठी घातक ठरला. त्याने जैश-ए-मोहम्मदला आणखी बळकटी दिली. अझहरने नंतर 2001 मध्ये भारतीय संसदेवर हल्ला आणि 2019 मध्ये पुलवामा हल्ला यासारखे मोठे हल्ले आखले.
India Vs Pakistan: खोटारडा पाकिस्तान! भारताकडून 'त्या' 5 दाव्यांची पुराव्यासह पोलखोल; पाहा VIDEO
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world