जाहिरात

Sharvari Wagh: माझ्यासाठी गेल्या 3 वर्षांतील ही दिवाळी बेस्ट आहे - शर्वरी वाघ

Sharvari Wagh : बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघने दिवाळीच्या लहानपणीच्या आठवणी केल्या शेअर, म्हणाली...

Sharvari Wagh: माझ्यासाठी गेल्या 3 वर्षांतील ही दिवाळी बेस्ट आहे -  शर्वरी वाघ

Sharvari Wagh : बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघसाठी वर्ष 2024 हे अतिशय खास ठरले आहे. शर्वरीचा 'मुंज्या' या सिनेमाने बॉक्सऑफिसवर 100 कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर 'महाराज' या वेबसीरिजमधील तिच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. तर 'वेदा' सिनेमाच्या माध्यमातून शर्वरीचे दमदार अभिनय कौशल्य चाहत्यांना पाहायला मिळाले. एकूणच बॉलिवूडची नवीन स्टार म्हणून शर्वरीची ओळख निर्माण होत आहे. प्रेक्षकांनी भरभरुन केलेल्या प्रेमाच्या वर्षापोटी तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

प्रेक्षकांचे आभार व्यक्त करत शर्वरी वाघ म्हणाली की,"गेल्या 3 वर्षांतील ही दिवाळी माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. मागील तीन वर्षे माझ्यासाठी एक अभिनेत्री म्हणून खरोखर कसोटीचा काळ होता. हा अस्तित्वाचा लढा होता. रोजचा संघर्ष आणि सतत ऑडिशन देणे. म्हणून मला मनापासून उत्सव साजरा करता आला नाही. मला वाटते की प्रत्येकाच्या बाबतीत असेच होते जेव्हा गोष्टी अपेक्षेप्रमाणे होत नाहीत. मी खूप आनंदी आहे की अखेर कष्टाचे फळ मिळाले".

(नक्की वाचा: शर्वरी वाघचा हा लुक पाहून म्हणाल,'ती परी अस्मानीची')

"यापुढेही अधिक यश आणि सर्वांकडून जास्तीत जास्त प्रेम मिळावे, अशी मी प्रार्थना करते. माझे कुटुंबीयही खूप आनंदी आहेत, हे मला माहिती आहे. माझ्या कठीण काळात ते माझा आधारस्तंभ झाले होते, याबाबत मी त्यांचे आभार मानते", अशाही भावना शर्वरीने व्यक्त केल्या.

शर्वरीच्या लहानपणीच्या आठवणी

दिवाळीतील बालपणीच्या आठवणी सांगताना शर्वरी म्हणाली की,"दरवर्षी नरक चतुर्दशीला आम्ही सूर्योदयापूर्वी उठतो. दिवे लावतो, जुनी मराठी गाणी ऐकतो, मोठी चटई टाकतो, कोमट तेल-उटणे- केशर एकमेकांच्या हातांवर आणि चेहऱ्यावर लावतो. या सर्व गोष्टी म्हणजे आमच्यासाठी 'पहिली पहाट'. आंघोळ केल्यानंतर आम्ही सर्वजण मिळून फराळाचा आस्वाद घेतो. चकली, चिवडा, शेव, करंजी, शंकरपाळे, बेसन लाडू यासारखे अनेक पदार्थ असतात. फराळाचा आस्वाद घेता-घेता आम्ही मनसोक्त गप्पाही मारतो."

(नक्की वाचा: Sharvari Wagh: शर्वरी वाघचे जबरदस्त फिटनेस)

शर्वरी कुटुंबीयांसोबत दिवाळी कशी साजरी करते?

शर्वरी म्हणते की,"माझ्यासाठी दिवाळी कुटुंबासोबत साजरी करणे खूप महत्त्वाचे आहे. माझा भाऊ शाळेत आहे. त्यामुळे त्याला दिवाळीची सुटी असते. माझी बहीणही ऑफिसमधून सुटी घेते. आपल्या परिवारासोबत राहणे, जेवणानंतर मिठाईचा आस्वाद घेताना गप्पा मारणे, यापेक्षा सण साजरा करण्याचा कोणता आनंद असू शकतो? हा एक असा भाग आहे जो मला खूप आवडतो आणि आनंदही देतो."

शर्वरी वाघचा आगामी सिनेमा

शर्वरीच्या आगामी सिनेमाबाबत सांगायचे झाले तर ती लवकरच वायआरएफ स्पाय युनिव्हर्सच्या "अल्फा" सिनेमामध्ये आलिया भटसोबत झळकणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com