जाहिरात

Kunal Kamra : कुणाल कामराच्या गाण्यावर टी-सीरिजचा कॉपीराइट स्ट्राइक, कॉमेडियनकडूनही जबरदस्त उत्तर

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे.

Kunal Kamra : कुणाल कामराच्या गाण्यावर टी-सीरिजचा कॉपीराइट स्ट्राइक, कॉमेडियनकडूनही जबरदस्त उत्तर

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील हॅबिटेट स्टुडिओमध्ये कुणाल कामराने सादर केलेल्या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुणालने 1987 चा चित्रपट मिस्टर इंडिया चित्रपटातील हवा हवाईची पॅरोडी सोशल मीडियावर शेअर केली. या गाण्याचा मालकी हक्क टी-सीरिजकडे आहे. कुणाल कामराची पॅरोडी समोर येताच टी-सीरिजने तातडीने कॉपीराइट स्ट्राइक केला आहे. दरम्यान कुणाल कामराही गप्प बसला नाही, त्याने टी-सीरिजला जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

टी-सीरिजकडून कॉपीराइट दावा...
कुणाल कामराने युट्यूबवर स्क्रीनशॉट शेअर करीत सांगितलं की, 'नया भारत' या त्याच्या व्हिडिओला कॉपीराइट उल्लंघन केल्याचं सांगत यूट्यूबवर ब्लॉक करण्यात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षक हे गाणं पाहू शकत नाही. इतकच नाही तर कॉपीराइटच्या कारणाने त्याला व्हिडिओचं मानधनही मिळणार नाही.

पुढे कामराने लिहिलंय, नमस्ते @TSeries, कुणाच्या इशाऱ्यावर बाहुल्याप्रमाणे वागू नका.  विडंबन आणि व्यंगचित्र कायदेशीर वाजवी वापराच्या अंतर्गत येतात. मी गाण्याचे बोल किंवा मूळ वाद्य वापरलेले नाहीत. जर तुम्ही हा व्हिडिओ हटवलं तर कव्हर गीत/नृत्याचे व्हिडिओ हटवावे लागतील. मेकर्स प्लीज याकडे लक्ष द्या. भारतात प्रत्येक एकाधिकार माफियापेक्षा कमी नाही. त्यामुळे माझा व्हिडिओ हटविण्यापूर्वी हा विशेष कार्यक्रम पाहा आणि डाऊनलोड करा. टी-सीरिज तुमच्या माहितीसाठी मी तामिळनाडूमध्ये राहतो. 

Kunal Kamra : 'बटर चिकन आवडलं नाही म्हणून टोमॅटोची लॉरी उलटवणार?' तोडफोडीनंतर कामराची पहिली इन्स्टा पोस्ट चर्चेत

नक्की वाचा - Kunal Kamra : 'बटर चिकन आवडलं नाही म्हणून टोमॅटोची लॉरी उलटवणार?' तोडफोडीनंतर कामराची पहिली इन्स्टा पोस्ट चर्चेत

टी-सीरिजकडून काय दावा केलाय?
टी-सीरिजच्या प्रवक्ताने केलेल्या दाव्यानुसार, कुणाल कामराने गाण्याचा वापर करण्यासाठी परवानगी घेतलेली नाही. अधिकारांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांचा व्हिडिओ ब्लॉक करण्यात आला आहे.