जाहिरात

Nawazuddin Siddiqui : "आम्ही साऊथ सिनेमे चोरले...", नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडला चोर म्हटले

Nawazuddin Siddiqui on Bollywood : बॉलिवूडमधील असुरक्षिततेबद्दल नवाजने म्हटलं की, "बॉलिवूडमध्ये एकच गोष्ट 5 वर्षांपर्यंत सुरु असते.  जेव्हा लोक कंटाळतात तेव्हा ती सोडली जाते.

Nawazuddin Siddiqui : "आम्ही साऊथ सिनेमे चोरले...", नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडला चोर म्हटले

Nawazuddin Siddiqui : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या कोस्टाओ सिनेमाच्या प्रमोशमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान नवाजुद्दीनने बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. बॉलिवूडमध्ये होत असलेल्या कंटेन्ट कॉपीच्या मुद्द्यावरून नवाजुद्दीनने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूडमध्ये क्रिएटिव्हिटीची कमतरता भासत असल्याचं देखील नवाजुद्दीनने बोलून दाखवलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

बॉलिवूडमधील असुरक्षिततेबद्दल नवाजने म्हटलं की, "बॉलिवूडमध्ये एकच गोष्ट 5 वर्षांपर्यंत सुरु असते.  जेव्हा लोक कंटाळतात तेव्हा ती सोडली जाते. बॉलिवूडमध्ये असुरक्षितता वाढत चालली आहे. सध्या एक फॉर्म्युला बॉलिवूडमध्ये सुरु आहे. ज्यात एकाच सिनेमाचे 2,3,4 सिक्वेल होत आहेत. बँक्रप्टसी होते तशी क्रिएटिवरप्ट्सी येथे सुरु आहे. सध्या येथे खूप गरीबी आहे. आमची इंडस्ट्री सुरुवातीपासूनच चोर आहे. आम्ही गाणी चोरली. कथा चोरली."

(नक्की वाचा-  Babil Khan : शूजित सरकारची पोस्ट, बाबिलचा बॉलिवूडवर निशाणा अन् आता माफीनामा; बॉलिवूडमध्ये काय चाललंय?)

नवाजुद्दीनने पुढे म्हटलं की, "चोर क्रिएटिव्ह कसे असू शकतात? आम्ही दक्षिणेकडून चोरी केली. कधी इथून-तिथून चोरी केली? काही कल्ट-फिल्म्सही हिट झाल्या. त्याचे सीन्सही चोरीला जात आहेत. हे इतके सामान्य झाले आहे की, चोरी असेल तर काय झालं? असा विचार केला जातो.  अशा इंडस्ट्रीकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवाल. अशाने अभिनेते आणि दिग्दर्शक निघून जाऊ लागतील, जसे अनुराग कश्यप, जो चांगले काम घेऊन येत होता."

नक्की वाचा - तिन्ही खानांसोबत काम केलं, IPL टीमची मालकीण आता राजकारणात ? अभिनेत्रीने थेट दिलं उत्तर

नवाजुद्दीन त्याच्या आगामी 'कोस्टाओ' सिनेमात गोवा कस्टम अधिकारी कोस्टाओ फर्नांडिस यांच्या भूमिकेत दिसणार आहे.  ज्यांनी एका मोठ्या सोन्याच्या तस्करी रॅकेटला पकडण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं.   सेजल शाह दिग्दर्शित या बायोग्राफीमध्ये प्रिया बापट, किशोर, हुसेन दलाल आणि महिका शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ZEE5 वर प्रसारित होत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: