जाहिरात

बिग बॉसच्या घरात वाहू लागले प्रेमाचे वारे, निक्की तांबोळीला आवडू लागलाय हा सदस्य?

Bigg Boss Marathi New Season Day 2 : 'बिग बॉस मराठी सीझन 5ची (Bigg Boss Marathi) जोरदार सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाल्याचे दिसले.

बिग बॉसच्या घरात वाहू लागले प्रेमाचे वारे, निक्की तांबोळीला आवडू लागलाय हा सदस्य?

Bigg Boss Marathi New Season Day 2 : 'बिग बॉस मराठी सीझन 5ची (Bigg Boss Marathi) जोरदार सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाल्याचे दिसले. बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रीमिअरला निक्की तांबोळी स्प्लिट्सविला स्टार असलेला अरबाज पटेलवर फिदा झाल्याचे दिसले. आता दुसऱ्या दिवशी छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे निक्की आणि अरबाज यांना ग्रीन सिग्नल देताना दिसून येणार आहे. 

(नक्की वाचा Bigg Boss Marathi 5 Day 1: मेकअप-लिपस्टिक.. वर्षा उसगांवकर-निक्की तांबोळीमध्ये पहिल्याच दिवशी तू तू-मै मै? नेमके काय घडलं)

छोटा पुढारीची बिग बॉसला विनंती

'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या दिवसाच्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य रोमँटिक अंदाजात दिसून येत आहेत. प्रोमोमध्ये निक्की तांबोळी (Nikki Tamboli) चहा तयार करण्यासाठी किचनमध्ये जाते. पण हीटर चालत नसल्याने ती छोटा पुढारीला 'बिग बॉस'ला विनंती करण्यास सांगते. त्यावेळी छोटा पुढारी म्हणतो,"बिग बॉस' आमच्या वहिनींचं तरी ऐका...". यावर अरबाज (Arbaz Patel) त्याला म्हणतो,"थांब रे सकाळी सकाळी असं काय म्हणतो तू..."

(पाहा फोटो :मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर उडालाय धुरळा)

कोणाचे प्रेम कोणावर चाललंय उतू?

पुढे छोटा पुढारी म्हणतो,"तुझे प्रेम उतू चाललंय ते सांगतोय.. चहा उतू गेला तर काही बिघडत नाही". छोटा पुढारीच्या Chota Pudhari) या वक्तव्यावर अरबाज आणि निक्कीला हसू आवरत नाही. अरबाज तर डोक्यालाच हात लावतो. त्यानंतरही छोटा पुढारी पुढे म्हणतो,"प्रेमात असंच असतंय, बिग बॉस'. छोटा पुढारीमुळे 'बिग बॉस मराठी'च्या घरात हास्यकल्लोळ होतो. 

(पाहा फोटो: का रे दुरावा! 2024मध्ये हे 5 सेलिब्रिटी एकमेकांपासून झाले वेगळे)

'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड प्रीमिअरला (Bigg Boss Marathi Season 5 Grand Premiere) निक्की तांबोळी अरबाजकडे पाहून लाजताना दिसली होती. अरबाजला पाहून सगळंच विसरली असल्याचं ती म्हणाली होती. रितेश देशमुखलाही थोडं थोडं काहीतरी होऊ शकतं, असं निक्की म्हणाली होती. तर दुसरीकडे अरबाजही, "निक्कीला आता सगळीकडे मीच दिसेन, माझ्याशिवाय तिला दुसरं काही सुचणार नाही", असं म्हणाला होता. त्यामुळे आता 'बिग बॉस मराठी'च्या या सीझनमध्ये निक्की आणि अरबाजची जोडी जमणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 

सार्वजनिक गणेशोत्सव बंद करा ! अभिनेत्री शुभांगी गोखले असं का म्हणाल्या?? पाहा सविस्तर चर्चा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Bigg Boss Marathi 5 : मेकअप-लिपस्टिक.. वर्षा उसगांवकर-निक्की तांबोळीमध्ये पहिल्याच दिवशी तू तू-मै मै? नेमके काय घडलं
बिग बॉसच्या घरात वाहू लागले प्रेमाचे वारे, निक्की तांबोळीला आवडू लागलाय हा सदस्य?
Shah rukh Khan suffering problem in eye will go to America for treatment
Next Article
शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला जाणार; किंग खानला नेमकं झालंय काय?