जाहिरात

CCTV Footage : 24 वर्षीय रशियन अभिनेत्रीचा समुद्रात बुडून मृत्यू, अखेरचा व्हिडीओ आला समोर

Russian Actress Death : मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने कमिलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो तिला वाचवू शकला नाही. अपघातानंतर सुमारे 15 मिनिटांनी बचाव पथक घटनास्थळी पोहोचले.

CCTV Footage : 24 वर्षीय रशियन अभिनेत्रीचा समुद्रात बुडून मृत्यू, अखेरचा व्हिडीओ आला समोर

प्रसिद्ध रशियन अभिनेत्री कमिला बेल्यात्स्कायाचं (Kamilla Belyatskaya) अपघाती निधन झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, थायलंडमध्ये समुद्रात बुडून अभिनेत्राची मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.  24 वर्षीय कमिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी थायलंडला गेली होती. कोह सामुई बेटावरील बीचवर योगा करत असताना अचानक आलेल्या लाटेमुळे ती समुद्रात खेचली गेली आणि तिचा बुडून मृत्यू झाला. 

अभिनेत्री कमिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत बीचवर एन्जॉय करत होती. समुद्र किनाऱ्यावर ती योगा करत होती. त्यावेळी एक लाट आणि पाण्याच्या प्रवाहासोबत ती समुद्रात वाहून गेली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओत दिसत आहे की ती समुद्रात दूरवर खेचली गेली. कमिलाने स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. 

 (नक्की वाचा - Shobhita Shivanna : दाक्षिणात्य सिनेसृष्टी हादरली; प्रसिद्ध अभिनेत्री घरात आढळली मृतावस्थेत)

पाहा VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने कमिलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो तिला वाचवू शकला नाही. अपघातानंतर सुमारे 15 मिनिटांनी बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र ते देखील अभिनेत्रीला वाचवू शकले नाही. घटनास्थळापासून काही किलोमीटर अंतरावर अभिनेत्रीचा मृतदेह आढळून आला.

(नक्की वाचा- एक्स-बॉयफ्रेंडला नव्या मैत्रिणीसह जाळून मारले, अभिनेत्री नर्गिस फाकरीच्या बहिणीला अटक)

रेस्क्यू सेंटरने याबाबत सांगितलं की, समुद्रकिनाऱ्यावर इशारा यंत्रणा बसवण्यात आली आहे. याद्वारे पर्यटकांना सतर्क केले जाते. आमची टीम पावसाळ्यात पर्यटकांना सतत सावध करत असते. याशिवाय लाल झेंडा दाखवून समुद्रात पोहण्यासाठी उतरू नका असा मेसेजही पर्यटकांना दिला जातो.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com