
Saiyaara Worldwide Box Office Collection: मोहित सूरी दिग्दर्शित आणि यश राज फिल्म्स निर्मित रोमँटिक ड्रामा चित्रपट 'सैयारा' ने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले आहे. या चित्रपटाने अवघ्या 11 दिवसांत जागतिक स्तरावर 404 कोटी रुपयांची जबरदस्त कमाई केली आहे. या यशाने 'सैयारा' हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा प्रेमकथा चित्रपट बनला आहे. पदार्पण करणारे कलाकार अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी या चित्रपटातून असा विक्रम प्रस्थापित केला आहे, जो यापूर्वी कोणत्याही नव्या कलाकारांच्या जोडीला करता आला नव्हता.
'सैयारा' हा चित्रपट 2025 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. आता त्याचे लक्ष्य 'छावा' या चित्रपटाचा रोकॉर्ड मोडण्यावर आहे. या वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपट म्हणून छावाकडे पाहीले जाते. 'सैयारा' ने भारतात 260.25 कोटी रुपये (निव्वळ कमाई) केली आहे. तर ग्रॉस कमाई 318 कोटी रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या चित्रपटाने 86 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने जोरदार मुसंडी मारली आहे.
शुक्रवारी 18.50 कोटी, शनिवारी 27.00 कोटी, रविवारी 30 कोटी आणि सोमवारी 9.50 कोटी रुपयांची बॉक्स ऑफीसवर कमाई केली आहे. एकूणच, दुसऱ्या आठवड्यात आतापर्यंत 85 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन झाले आहे. फक्त 50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'सैयारा' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट 2004 सालच्या कोरियन चित्रपट 'अ मोमेंट टू रिमेंबर' पासून प्रेरित असल्याचे सांगितले जात आहे.'सैयारा' ने 'हाउसफुल 5', 'रेड 2', 'सिकंदर' आणि 'सितारे जमीन पर' यासारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. आता तो केवळ विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटापेक्षा मागे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world