जाहिरात

सलमान खानने सांगितले लॉरेन्स बिश्नोई का देतोय धमकी? जबाबाद्वारे मोठे खुलासे

Salman Khan: अभिनेता सलमान खानने सांगितले की, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्याचे कुटुंब भितीच्या सावटाखाली राहत आहे.

सलमान खानने सांगितले लॉरेन्स बिश्नोई का देतोय धमकी?  जबाबाद्वारे मोठे खुलासे

बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी सोमवारी (8 जुलै 2024) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यानुसार सलमान खानने आपल्या जबाबामध्ये सांगितले की, त्याने काहीही चुकीचे केलेले नाही. तरीही त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना टार्गेट करून त्रास दिला जात आहे.

(नक्की वाचा: लॉरेन्स गँगने सलमान खानला मारण्यासाठी 25 लाखांची घेतली होती सुपारी, चार्जशीटमधून खुलासा : सूत्र)

आरोपपत्रानुसार सलमानने म्हटले आहे की, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी त्रास देत आहे. तसेच त्याने पोलिसांना अशाही काही घटना सांगितल्या, जेथे त्याला धमक्या देण्यात आल्या होत्या. बिश्नोई टोळीकडून वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्याचे कुटुंब भीतीमध्ये वावरत असल्याचेही त्याने सांगितले.  

14 एप्रिल 2024 रोजी पहाटेच्या वेळेस बाइकवरून आलेल्या दोन जणांनी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर चार वेळा गोळीबार केला होता. 

Latest and Breaking News on NDTV

मुंबई पोलिसांच्या चार्जशीमध्ये कारागृहात बंदिस्त असणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह सहा अटकेतअसलेले आरोपी आणि तीन वाँटेड आरोपींचे नाव दाखल करण्यात आले आहे. गुन्हे शाखेने विशेष मकोका न्यायालयामध्ये दाखल केलेल्या 1 हजार 735 पानांच्या आरोपपत्रात तीन खंडांमध्ये तपासाशी संबंधित विविध कागदपत्रांचा समावेश आहे. 

(नक्की वाचा: सलमान खानच्या या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर दिसेल जादू, पठाण-गदर चित्रपटांचा मोडणार रेकॉर्ड?)

आरोपपत्रातील पुराव्यामध्ये 46 साक्षीदारांचे जबाब आणि CrPC कलम 164 अन्वये दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश आहे. याशिवाय मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण) कायद्यांतर्गत कबुली जबाब, एकूण 22 पंचनामे आणि तांत्रिक पुरावे हे देखील आरोपपत्राचा भाग आहेत.

मुंबई क्राइम ब्रांचने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले गेले आहे की, देशाच्या उत्तर-पश्चिम भागानंतर आता महाराष्ट्रामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे लक्ष्य होते. बिश्नोईने पैसे उकळण्यासाठी आणि त्याचे खंडणी रॅकेट वाढवण्याच्या उद्देशाने भीती निर्माण करण्यासाठी सलमान खानला लक्ष्य केले.

Latest and Breaking News on NDTV
बिश्नोईचा सहभाग असल्याचे सिद्ध करणारा भक्कम डिजिटल पुरावा देखील पोलिसांनी सादर केला आहे. जसे की पोर्तुगालमधून शेअर केलेली फेसबुक पोस्ट आणि अनमोल बिश्नोई व अटक करण्यात आलेल्या आरोपी यांच्यातील संभाषणाचे तीन ते पाच मिनिटांचे रेकॉर्डिंग, जे फॉरेन्सिक विश्लेषणादरम्यान अनमोल बिश्नोईच्या आवाजाच्या नमुन्यांशी मिळतेजुळते असल्याचे दिसते. लॉरेन्सच्या आदेशावरुन ही पोस्ट पोर्तुगालमधून अनमोल बिश्नोईने केली होती. अटकेतील आरोपी विकी गुप्ताच्या मोबाइलमध्येही ही पोस्ट सापडली होती.

गुन्हे शाखेला गुप्ताच्या फोनमध्येही तीन ते पाच मिनिटांचे रेकॉर्डिंग सापडले, जेथे तो अनमोल बिश्नोईशी बोलत होता आणि अभिनेत्याच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराची योजना आखत असल्याचेही पुरावे आढळले. 

Solapur Sharad Koli | उबाठा गटाचे शरद कोळी यांना जीवे मारण्याची धमकी 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
कोण आहे स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल? दोघांमध्ये किती आहे वयाचं अंतर, कुणाची कमाई जास्त?
सलमान खानने सांगितले लॉरेन्स बिश्नोई का देतोय धमकी?  जबाबाद्वारे मोठे खुलासे
madhuri-dixit-crush-on-18-year-older-cricketer-she-aspired-to-chase
Next Article
माधुरी दीक्षितच्या स्वप्नात यायचा 'हा' क्रिकेटपटू, तिच्यापेक्षा 18 वर्षांनी आहे मोठा