जाहिरात
Story ProgressBack

सलमान खानच्या या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर दिसेल जादू, पठाण-गदर चित्रपटांचा मोडणार रेकॉर्ड?

Salman Khan New Movie: सलमान खानकडे आता असे सिनेमे आहेत, जे रिलीज होताच काही दिवसांतच सक्सेस पार्टी नक्कीच करण्यात येईल; याची सिनेरसिकांना खात्री आहे. सलमानचे हे सिनेमे सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्डही मोडू शकतात, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

Read Time: 3 min
सलमान खानच्या या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर दिसेल जादू, पठाण-गदर चित्रपटांचा मोडणार रेकॉर्ड?

Salman Khan New Movie:  सुपरहिट सिनेमे देण्यासाठी ओळखला जाणारा बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या चित्रपटांची रसिक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. आजवर कित्येक सुपरहिट सिनेमे देणाऱ्या सलमान खानचे मागील काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले नाही. पण यामुळे हताश न होता सलमान कंबर कसून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. 'टायगर 3' सिनेमानंतर सलमान लवकरच अनेक जबरदस्त सिनेमे चाहत्यांसाठी घेऊन येत आहे, जे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू शकतात. भाईजानच्या आगामी सिनेमांबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सलमानचे कोणते सिनेमे बॉक्स ऑफिसवर झळकणार आहेत? याची माहिती जाणून घेऊया...

(नक्की वाचा: सिनेमाचे बजेट 11 कोटी, कमाई झाली पाचपट आणि इंडस्ट्रीला मिळाले 3 सुपरस्टार)

सलमान खानचे आगामी सिनेमे 

1. सिकंदर

सलमान खानच्या आगामी सिनेमांच्या यादीतील 'सिकंदर' सिनेमा सर्वाधिक चर्चेत आहे. वर्ष 2025 मध्ये म्हणजे पुढील वर्षी ईद सणाच्या मुहूर्तावर 'सिकंदर' सिनेमा रिलीज होणार आहे. एआर मुरुगदास या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. सिनेमाच्या नावाची घोषणा होताच, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. 

(नक्की वाचा: हे बेबी फेम क्युट Angel 17 वर्षांनंतर दिसते अशी, गालावरच्या खळीवर चाहते फिदा)

2. टायगर वर्सेस पठाण

शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमामध्ये पाहुणा कलाकार म्हणून सलमान खानची झलक पाहायला मिळाली होती. यानंतरच या सिनेमाचे कथानक ठरले. सलमानच्या आगामी सिनेमांच्या यादीमध्ये 'टायगर वर्सेस पठाण' सिनेमाचाही समावेश आहे. या सिनेमामध्ये प्रेक्षकांना सलमान आणि शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्रित दिसतील. या सिनेमामध्ये प्रेक्षकांना अ‍ॅक्शन-ड्रामा पाहायला मिळणार आहे. 

3. शेर खान

सोहेल खान सलमान खानसह 'शेर खान' सिनेमावर काम करत आहे. या सिनेमाचीही घोषणा करण्यात आली आहे. 'शेर खान' सिनेमाच्या निमित्ताने सलमान खान पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवू शकतो.  

4. प्रेम की शादी

राजश्री प्रोडक्शनच्या सिनेमांमध्ये 'प्रेम' हे पात्र साकारून प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा सलमान पुन्हा एकदा 'प्रेम' हे पात्र साकारणार आहे. त्याच्या आगामी सिनेमांच्या यादीमध्ये 'प्रेम की शादी' या चित्रपटाचाही समावेश आहे. सलमान खान या सिनेमामध्ये काम करून आपल्या चाहत्यांना 'प्रेम की शादी' हा सिनेमा भेट स्वरुपात देणार आहे. चाहते देखील या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  

(नक्की वाचा: विकी-विद्याचा तो वाला व्हिडीओ पाहिला का? Rajkummar Rao आणि Tripti Dimriचा रोमान्स)

5. द बुल

एका मुलाखतीमध्ये सलमान खानने 'द बुल' सिनेमाचा उल्लेख केला होता. यानुसार सलमानच्या चाहत्यांना त्याचा आणखी एक सिनेमा पाहायला मिळणार आहे. 

6. बजरंगी भाईजान 2

मुन्नीसह संपूर्ण देशाचा झालेला भाईजान सलमान खान लवकरच 'बजरंगी भाईजान 2' सिनेमाही घेऊन येत आहे. वर्ष 2015मध्ये झळकलेल्या या सिनेमामध्ये सलमान खानने पवन कुमार चतुर्वेदीची भूमिका साकारली होती आणि पाकिस्तानच्या छोट्या मुन्नीला तिच्या घरी सुखरुप सोडण्याचे काम केले. या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.   

7. दबंग 4

'दबंग' सिनेमा सलमान खानसाठी अतिशय लकी ठरला आहे. दबंगच्या तीनही सीक्वेल्सला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. आता सलमान खान लवकरच 'दबंग 4' सिनेमामध्येही दिसणार आहे. या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळेल आणि भाईजानच्या यशाची घोडदौड पुन्हा सुरू होईल, अशी आशा चाहते व्यक्त करत आहेत. 

PM Narendra Modi Seva | स्वयंपाक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुद्वारात सेवा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination