बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी सोमवारी (8 जुलै 2024) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यानुसार सलमान खानने आपल्या जबाबामध्ये सांगितले की, त्याने काहीही चुकीचे केलेले नाही. तरीही त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना टार्गेट करून त्रास दिला जात आहे.
(नक्की वाचा: लॉरेन्स गँगने सलमान खानला मारण्यासाठी 25 लाखांची घेतली होती सुपारी, चार्जशीटमधून खुलासा : सूत्र)
14 एप्रिल 2024 रोजी पहाटेच्या वेळेस बाइकवरून आलेल्या दोन जणांनी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर चार वेळा गोळीबार केला होता.
मुंबई पोलिसांच्या चार्जशीमध्ये कारागृहात बंदिस्त असणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह सहा अटकेतअसलेले आरोपी आणि तीन वाँटेड आरोपींचे नाव दाखल करण्यात आले आहे. गुन्हे शाखेने विशेष मकोका न्यायालयामध्ये दाखल केलेल्या 1 हजार 735 पानांच्या आरोपपत्रात तीन खंडांमध्ये तपासाशी संबंधित विविध कागदपत्रांचा समावेश आहे.
(नक्की वाचा: सलमान खानच्या या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर दिसेल जादू, पठाण-गदर चित्रपटांचा मोडणार रेकॉर्ड?)
मुंबई क्राइम ब्रांचने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले गेले आहे की, देशाच्या उत्तर-पश्चिम भागानंतर आता महाराष्ट्रामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे लक्ष्य होते. बिश्नोईने पैसे उकळण्यासाठी आणि त्याचे खंडणी रॅकेट वाढवण्याच्या उद्देशाने भीती निर्माण करण्यासाठी सलमान खानला लक्ष्य केले.
गुन्हे शाखेला गुप्ताच्या फोनमध्येही तीन ते पाच मिनिटांचे रेकॉर्डिंग सापडले, जेथे तो अनमोल बिश्नोईशी बोलत होता आणि अभिनेत्याच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराची योजना आखत असल्याचेही पुरावे आढळले.