Yash Toxic Movie Poster Launch : 2026 मधील सर्वात मोठ्या रिलीजपैकी एका सिनेमाचा काउंटडाउन अधिकृतपणे सुरू झाला आहे. टॉक्सिक: ए फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स या चित्रपटाच्या रिलीजला फक्त 100 दिवस उरले आहेत. अशातच निर्मात्यांनी सुपरस्टार यशचा एक जबरदस्त पोस्टर शेअर करून सेलिब्रेशन सुरू केले आहे. या थरारक पोस्टरची इंटरनेटवर तुफान चर्चा रंगली आहे. हा सिनेमा 19 मार्च 2026 रोजी रिलीज होणार आहे. या हंगामात मोठे सण-उत्सवही साजरे केले जातात. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मजबूत गल्ला जमवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हा पोस्टर इतका थरारक आहे की, यात अभिनेता यश रक्ताने माखलेल्या बाथटबमध्ये दिसतो आहे. या पोस्टरमध्ये यशची मस्क्युलर फ्रेम आणि शरीरावर कोरलेले डिटेल्ड टॅटू स्पष्टपणे दिसत आहेत. तसच पोस्टरमध्ये यशचा चेहरा लपलेला आहे. त्यामुळे सिनेमाची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. केजीएफनंतर यशचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार, असा सूर सोशल मीडियावर आवळला जात आहे.
त्या कलाकाराने केजीएफमध्येही यशसोबत केलं काम
मेकर्सनी ‘टॉक्सिक' तयार करणाऱ्या टीमबद्दल नवीन माहिती शेअर केली आहे. नॅशनल अवॉर्ड विजेते सिनेमॅटोग्राफर राजीव रवी या सिनेमाच्या व्हिज्युअल्सचं, तर रवी बसरूर,ज्यांनी यापूर्वी KGF मध्ये यशसोबत काम केले होते,त्यांन या सिनेमाच्या संगीताची जबाबदारी घेतली आहे.सिनेमाचं एडिटिंग उज्ज्वल कुलकर्णी यांनी केलं आहे आणि प्रोडक्शन डिझाइनचे काम टीपी आबिद यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
इथे पाहा यशच्या आगामी सिनेमाचा पोस्टर

ऍक्शनला इंटरनॅशनल टच देताना,हॉलीवूड फिल्ममेकर जेजे पेरी,जे जॉन विक मधील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात.त्यांनी काही मोठे ऍक्शन सेट-पीस डिझाइन केले आहेत.त्यांचा सहभाग हा मेकर्सनी घोषणा झाल्यापासून ज्या स्केल आणि महत्त्वाकांक्षेचा इशारा दिला होता,त्याचे स्पष्ट दर्शन घडवतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world