
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संघाचा खेळाडू यश दयाल पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर आता जयपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. यामुळे क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या सांगानेर पोलीस ठाण्यात यश दयाल विरोधात एक नवीन एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार मुलीचा आरोप आहे की, आयपीएल 2025 च्या सामन्यांदरम्यान जयपूरमधील एका हॉटेलमध्ये तिचा बलात्कार करण्यात आला. पीडित युवतीने पोलिसांना सांगितले की, ती क्रिकेटमध्ये करिअर करण्याच्या उद्देशाने यश दयालच्या संपर्कात आली होती. क्रिकेट करिअरच्या टिप्स देण्याच्या बहाण्याने यश दयालने तिला हॉटेलमध्ये बोलावले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले.
(नक्की वाचा- Ayush Mhatre: मुंबईकर आयुष म्हात्रेनं रचला इंग्लंडमध्ये इतिहास, दनादन रन्स करत मोडला 24 वर्ष जुना रेकॉर्ड)

पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती यश दयालच्या संपर्कात आली तेव्हा ती दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन होती. याच काळात यश दयालने तिला इमोशल ब्लॅकमेल करून दोन वर्षांपर्यंत बलात्कार केला. पहिली भेट जयपूरमध्ये झाली होती, जेव्हा यश दयाल आयपीएल सामना खेळण्यासाठी तिथे आला होता. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी यश दयालविरोधात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) कायद्याखालीही एफआयआर दाखल केली आहे, ज्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
(नक्की वाचा- Asia Cup 2025: ठरलं! आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार, कधी अन् कुठे होणार स्पर्धा? वाचा डिटेल्स)
यश दयालवर आधीही लैंगिक शोषणाचे आरोप
यश दयालवर लैंगिक शोषणाचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, जुलै महिन्यात गाझियाबादमधील इंदिरापुरम पोलीस ठाण्यात एका महिलेने त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. त्या महिलेने यश दयालवर लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात यश दयालने प्रयागराज पोलिसांकडे जाऊन आपल्याला ब्लॅकमेल केले जात असल्याचा दावा करत, संबंधित युवतीविरोधात तक्रार दाखल केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world