What is e KYC: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्यात ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक महिलांना ई केवायसी नेमकं काय आहे हेच माहिती नाही. यासह अनेकांना ई केवायसी काय आहे, त्याची प्रक्रिया काय आहे, फायदे काय आहे याची माहिती नाही. याबद्दल आज जाणून घेऊयात.
डिजिटल युगात ओळख पटवणे ही एक मूलभूत गरज बनली आहे. बँक खाते उघडणे, नवीन मोबाईल प्लान घेणे किंवा ऑनलाइन आरोग्य सेवा मिळवण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य असते. पूर्वी यासाठी कागदपत्रे आणि वैयक्तिक भेटीची आवश्यकता होती. ज्यामुळे प्रक्रिया खूप किचकट आणि वेळखाऊ होती. मात्र, आता ‘ई-केवायसी' (e-KYC) या तंत्रज्ञानाने यात क्रांती घडवली आहे. या आधुनिक प्रक्रियेमुळे वेळ वाचतो आणि फसवणुकीचा धोकाही कमी होतो.
ई-केवायसी म्हणजे काय?
ई-केवायसीचा पूर्ण अर्थ आहे 'इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर' (Electronic Know Your Customer). ही ग्राहकाची ओळख आणि पत्त्याची डिजिटल पद्धतीने पडताळणी करण्याची आधुनिक प्रक्रिया आहे. यामध्ये कागदी कागदपत्रांची गरज नसते. ही प्रक्रिया प्रामुख्याने आधार कार्ड प्रमाणीकरणावर आधारित आहे.
(नक्की वाचा- Ladki Bahin e-KYC: 'लाडकी बहीण'साठी e-KYC करताना फसवणुकीचा धोका; कशी काळजी घ्याल?)
ई-केवायसी प्रक्रिया कशी काम करते?
भारतात ई-केवायसी प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर द्यावा लागतो आणि सेवा पुरवणाऱ्या संस्थेला तुमचा डेटा वापरण्याची परवानगी द्यावी लागते. त्यानंतर ती संस्था UIDAI च्या डेटाबेसमध्ये जाऊन तुमच्या ओळखीची, पत्त्याची आणि इतर माहितीची पडताळणी करते.
ही प्रक्रिया जलद आणि सुरक्षित आहे. तुम्ही बायोमेट्रिक्स किंवा तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेल्या OTP द्वारे ई-केवायसी करू शकता. यामुळे तुम्हाला कोणत्याही संस्थेच्या सेवा सहज मिळवता येतात.
आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी मधील फरक
आधार प्रमाणीकरण आणि आधार ई-केवायसी दोन्ही ओळख पडताळणीसाठी वापरल्या जातात, पण त्यात काही महत्त्वाचे फरक आहेत. आधार ई-केवायसी प्रक्रियेत तुमच्या ओळखीसोबतच नाव, लिंग, पत्ता आणि जन्मतारीख यांसारखी वैयक्तिक माहितीही पडताळली जाते. युआयडीएआय डेटाबेसमध्ये ही माहिती जुळवून पाहिली जाते आणि आवश्यक तीच माहिती शेअर केली जाते.
तर आधार प्रमाणीकरण ही फक्त तुमच्या ओळखीची पडताळणी करते. यामध्ये कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर केली जात नाही. तुमच्या दिलेल्या माहितीनुसार, युआयडीएआय 'होय' किंवा 'नाही' असे उत्तर देते.
(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna e-KYC : पती-वडील हयात नसतील तर काय? फॉर्म एडिट कसा कराल? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर)
ई-केवायसीचे फायदे
- ई-केवायसीसाठी तुमची परवानगी आवश्यक असते. ओटीपी किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरणाने तुम्ही परवानगी दिल्यावरच संस्था तुमच्या माहितीचा वापर करू शकते.
- ही प्रक्रिया सुरक्षित डिजिटल पद्धतींवर आधारित असल्यामुळे, कागदपत्रांमध्ये फेरफार (करण्याचा धोका कमी होतो.
- ई-केवायसी प्रक्रिया काही मिनिटांतच पूर्ण होते, ज्यामुळे वेळेची बचत होते.
- या प्रमाणीकरण प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क लागत नाही, ज्यामुळे ती आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर ठरते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world