जाहिरात

Gold Rates: सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; चेक करा आजचे दर

Gold-Silver Prices : एक लाख पार गेलेलं सोनं 92 हजार रुपयांपर्यंत स्वस्त झालं आहे. सोन्याचे दर कालच्या तुलनेत आज दोन हजार रुपयांना कमी झाले आहेत.

Gold Rates: सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; चेक करा आजचे दर

Gold-Silver Rates : एक लाखांच्या पार गेलेले सोन्याचे दर हळूहळू खाली येताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्यात दरात घट होत आहे. आज देखील सोन्याचे दर प्रति तोळे 2 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. लग्नसराईत सोन्याच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

एक लाख पार गेलेलं सोनं 92 हजार रुपयांपर्यंत स्वस्त झालं आहे. सोन्याचे दर कालच्या तुलनेत आज दोन हजार रुपयांना कमी झाले आहेत. आज सकाळी सोन्याचे दर जीएसटी वगळून प्रति तोळे 92,100 रुपयांवर आले आहेत. जे काल संध्याकाळी 94,100 रुपये प्रति तोळे होते.

(नक्की वाचा-  Mobile App : हे 5 सरकारी अ‍ॅप तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवेत! काय होईल फायदा?)

चांदीच्या दरातही घसरण

सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही 2600 रुपयांची घट झाली आहे. चांदीच दर काल संध्याकाळी 97400 रुपये प्रति किलो होते. जे आज सकाळी 94,800 रुपये प्रति किलो आहेत. 

(नक्की वाचा-  Post Office Scheme : बँक FD पेक्षा जास्त व्याज, गुंतवणूकही सुरक्षित; दरमाह मिळतील चांगले पैसे)

सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?

आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती, सरकारचे कर आणि रुपयाच्या मूल्यातील चढ-उतार अशा अनेक कारणांमुळे भारतात सोन्याच्या किमतीत बदल होतो. सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही त्यासोबत भारतीयांचा भावनिक नातं आहे. लग्न आणि सणांमध्ये सोन्याची मागणीत मोठी वाढ होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com