जाहिरात

Gold Rate Today : सोनं पुन्हा लाखांच्या पार! मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरात काय आहेत?

Gold Silver rate Today: अमेरिकेकडून ऑगस्ट महिन्यापासून लागू शुल्कांबद्दल गुंतवणूकदारांमध्ये  सोन्याला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पसंती दिली जात आहे. वाढलेल्या दरांमुळे भारतातील किरकोळ खरेदीदारांना सोन्याची खरेदी करणे कठीण झाले आहे.

Gold Rate Today : सोनं पुन्हा लाखांच्या पार! मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरात काय आहेत?

Gold Rate Today : सोन्याच्या दरात सातत्याने विक्रमी वाढ सुरूच आहे. सोमवारी २१ जुलै रोजी २४ कॅरेट सोन्याने प्रति तोळे १ लाखांचा टप्पा पुन्हा एकदा ओलांडला. सोन्याच्या दरात झालेली ही वाढ अनपेक्षित नसली तरी, तिच्या वेगाने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे.

सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळे दर वाढून १ लाख १५० रुपये इतका वाढला. तर, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळे ९,१८००, तर १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ७,५११० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याने १ लाखांचा टप्पा कायम राखला आहे, जो सोन्यासाठी एक ऐतिहासिक उच्चांक ठरला आहे.

( नक्की वाचा: गुंतवणूक करण्याचे 4 बेस्ट पर्याय, तज्ज्ञ काय सांगतात एकदा पाहाच )

सोन्याच्या दरात वाढीचं कारण

सोन्याच्या दरातील वाढीमागे जागतिक बाजारातील अस्थिरता, भू-राजकीय अनिश्चितता आणि सततचे व्यापार तणाव ही प्रमुख कारणे आहेत. अमेरिकेकडून ऑगस्ट महिन्यापासून लागू शुल्कांबद्दल गुंतवणूकदारांमध्ये  सोन्याला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पसंती दिली जात आहे. वाढलेल्या दरांमुळे भारतातील किरकोळ खरेदीदारांना सोन्याची खरेदी करणे कठीण झाले आहे. जून २०२५ मध्ये सोन्याची महागाई दर गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळजवळ ३० टक्के जास्त होता, जो ग्राहक किंमत निर्देशांकानुसार सर्वात जास्त महागाई वाढलेल्या वस्तूंमध्ये समाविष्ट आहे.

प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

  • मुबंई - १००१५० रुपये/प्रतितोळे
  • पुणे- १००१५० रुपये/प्रतितोळे
  • नागपूर - १००१५० रुपये/प्रतितोळे 
  • नाशिक- १००१८० रुपये/प्रतितोळे
  • छत्रपती संभाजीनगर - १००१५० रुपये/प्रतितोळे

( नक्की वाचा: बँक FD पेक्षा जास्त व्याज, गुंतवणूकही सुरक्षित; दरमाह मिळतील चांगले पैसे )

याउलट, चांदीच्या दरात सोमवारी स्थिरता दिसून आली. चांदीचा दर प्रति किलो १,१६,००० रुपये या विक्रमी उच्चांकावर स्थिर राहिला. जागतिक पातळीवर अनिश्चितता आणि औद्योगिक मागणीमुळे चांदीच्या दरातही वाढ झाली असली तरी, सोन्याच्या तुलनेत ही वाढ तितकी वेगवान नाही. यामुळे चांदीचे मूल्यांकन सोन्यापेक्षा अधिक आकर्षक ठरत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com