जाहिरात
Story ProgressBack

सोन्याचे भाव आणखी घसरले, खरेदीची योग्य वेळ कोणती?

Gold Price Today : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये घसरण होत आहे.

Read Time: 2 min
सोन्याचे भाव आणखी घसरले, खरेदीची योग्य वेळ कोणती?
Gold Price Today : गेल्या दहा दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 2900 रुपयांची घसरण झाली आहे.
मुंबई:

Gold Price Today : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये घसरण होत आहे. बुधवारी (24 एप्रिल) सकाळी एक तोळा सोन्याची किंमत 70,987 रुपये होती. त्यानंतर दुपारी ही किंमत 110 रुपयांनी कमी होऊन 70,919 रुपये झाली. दहा दिवसांपूर्वी सोन्याचे दर 73,958 रुपयांवर पोहचले होते. या रेकॉर्डब्रेक उच्चांकानंतर त्यामध्ये सातत्यानं घसरण होतीय. गेल्या दहा दिवसांमध्ये या दरांमध्ये 2900 रुपयांची घसरण झाली असून आता हे दर 71000 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. 

तर, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीची किंमत (Silver Rate today) देखील घसरली आहे. चांदीचे दर बुधवारी सकाळी 80753 रुपये किलो होते. त्यामध्ये दुपारपर्यंत 286 रुपये (0.35%) घसरण झाली. हे दर सध्या 80400 पर्यंत आले आहेत.  

( नक्की वाचा : कोटक महिंद्रा बँकेविरोधात RBI ची मोठी कारवाई )

जागतिक पातळीवर सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price Today) बुधवारी थोडी वाढ झाली. पण, एका टप्प्यानंतर किंमती स्थिर झाल्या. फेडर रिझर्व्ह  (Federal Reserve) बँकेचा व्याज दर आणि अमेरिकेतील आर्थिक आकडेवारीवर गुंतवणूकदारांचं लक्ष होतं. 

गेल्या सत्रात 5 एप्रिलनंतर सर्वात कमी पातळीवर सोन्याचे दर पोहचले होते. त्यानंतर सोन्याच्या ताज्या भावात (Spot Gold) 0.2 टक्के वाढ होऊन तो 2.327.86 डॉलर प्रती औंस झाला होता. अमेरिकन सोन्याचा बाजार $2,340.90 वर स्थिर होता. 

( नक्की वाचा : मुंबईतील बँकेवर RBI चे निर्बंध, ग्राहकांना बसणार मोठा फटका ) 
 

या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतांनुसार, फेडरल बँकेत व्याज दरामध्ये कपात केली जाईल, असा अंदाज होता. त्यामुळे सोने-चांदीचे दर वाढले होते. त्याचबरोबर इस्रायल-इराण यांच्यातील युद्धाच्या भीतीनं हे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. पश्चिम आशियातील दोन बड्या लष्करी सत्तेमधील युद्धाचे ढग सध्या विरले आहेत, त्यामुळे या किंमतीमध्ये घसरण होत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination