बँकिंग क्षेत्र नियामक भारतीय रिझर्व बँकेने कोटक महिंद्रा बँकेविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाइन किंवा मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून नवे ग्राहक जोडण्यावर निर्बंध आणले आहेत. याशिवाय आरबीआयने कोटक बँकेच्या नव्या क्रेडिट कार्ड्स जारी करण्यावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने सांगितलं की, कोटक महिंद्रा बँक आपल्या सद्यस्थितीतील ज्या ग्राहकांकडे क्रेडिट कार्ड आहेत, त्यांना मात्र सर्व सेवा पूरवल्या जातील.
मिळालेल्या माहितीनुसार, कोटक बँकेच्या आयटी यंत्रणेत त्रुटी सापडल्याने बँकेच्या मोबाइल आणि ऑनलाइन माध्यमातून नवे ग्राहक जोडता येणार नाही. यापूर्वीच RBI ने कोटक बँकेला आयटी यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यास सांगितलं होतं. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शेवटी आरबीयने मोबाइल आणि ऑनलाइन माध्यमातून ग्राहक जोडण्यावर निर्बंध आणले. यापुढे कोटक महिंद्रा बँकेला नव्या क्रेडिट कार्डांचं वितरण करता येणार नाही, कारण RBI ने त्यावरही निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे.
2020 मध्ये HDFC बँकेवरही केली होती कारवाई..
2020 मध्ये HDFC वरही केडिट कार्ड वितरीत करण्यावर RBI कडून निर्बंध घालण्यात आले होते. त्यानंतर HDFC बँकेला पुन्हा ही यंत्रणा सुरू करण्यासाठी दोन वर्षे लागली होती. त्यामुळे कोटक महिंद्रा बँकेवरील निर्बंध केव्हा हटवले जातील आणि त्यांना केडिट कार्ड वितरीत करता येईल याचा नेमका कालावधी सांगणं कठीण दिसत आहे.
Reserve Bank of India has today directed Kotak Mahindra Bank Limited to cease and desist, with immediate effect, from onboarding new customers through its online and mobile banking channels and issuing fresh credit cards.
These actions are necessitated based on significant… pic.twitter.com/ccMz1EJRlI
— ANI (@ANI) April 24, 2024
कोटक महिंद्राचा 4 टक्के व्यवसाय क्रेडिट कार्डातून..
क्रेडिट कार्ड वितरणावर निर्बंध आणण्याच्या आरबीआयच्या निर्णयामुळे कोटक बँकेला मोठा फटका सहन करावा लागणार आहे. विशेष म्हणजे बँकेचा 4 टक्के व्यवसाय हा क्रेडिट कार्डातून होतो, त्यामुळे बँकेला मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world