जाहिरात

Ratan Tata : जेव्हा रतन टाटांना मिळाला होता लाच देण्याचा सल्ला, सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे उत्तर

Ratan Tata on Corruption : रतन टाटांना त्यांच्या अब्जाधीश मित्रानं लाच देण्याचा सल्ला दिला होता.

Ratan Tata : जेव्हा रतन टाटांना मिळाला होता लाच देण्याचा सल्ला, सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे उत्तर
Ratan Tata : रतन टाटांनी दिलं भ्रष्टाचारावर उत्तर
मुंबई:

Ratan Tata : जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांनी NDTV ला 2010 साली दिलेल्या एका मुलाखतीची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. त्या खास मुलाखतीमध्ये (Ratan Tata Interview)  टाटांनी त्यांच्याबरोबर घडलेली एका खास घटनेचा उल्लेख केला होता. रतन टाटा यांना त्यांच्या एका अब्जाधीश मित्रानं एका व्यावसायिक कराराच्या बदल्यात लाच (Ratan Tata On Corruption) देण्याचा प्रस्ताव दिला होता. पण, टाटांनी तो प्रस्ताव तात्काळ फेटाळला. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय होता भ्रष्टाचार रोखण्याचा टाटांचा मंत्र?

दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांनी NDTV ला सांगितलं होतं की, त्यांच्या अब्जाधीश मित्रानं एका व्यावसायिक करारासाठी एका मंत्र्याला 15 कोटी रुपये देण्याचा सल्ला दिला होता. तो सल्ला त्यांनी फेटाळला. त्यानंतर अब्जाधीश मित्रानं त्यांना तुम्ही भ्रष्टाचार करणं कसं टाळता? हा प्रश्न विचारला. त्यावरील रतन टाटांनी दिलेलं उत्तर सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे.

टाटा म्हणाले की, 'त्यासाठी स्वयं अनुशासन आवश्यक आहे. ते तुम्हाला कधीही समजणार नाही. रात्री बिछान्यावर झोपताना मी आज भ्रष्टाचार केला नाही, ही भावना मला महत्त्वाची वाटते.'

Ratan Tata : JLR ची सवारी ते एअर इंडियाची घरवापसी, रतन टाटांच्या नेतृत्त्वातील 5 महत्त्वाचे निर्णय

( नक्की वाचा : JLR ची सवारी ते एअर इंडियाची घरवापसी, रतन टाटांच्या नेतृत्त्वातील 5 महत्त्वाचे निर्णय )

रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षाी जगाला अलविदा केला. त्यांचं बुधवारी (9 ऑक्टोबर 2024) रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानं उद्योग विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. देशाच्या औद्योगिक विश्वाला नवा आकार देणारे दूरदर्शी उद्योजक म्हणून रतन टाटा नेहमीच लक्षात राहतील. त्यांच्या नेतृत्त्वाखाली टाटा समुहानं नवी भरारी घेतली. उद्योग विश्वात यशाची शिखरं गाठत असतानाही त्यांनी कधीही साधेपणा सोडला नाही. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत नैतिकता जपली. त्यामुळेच त्यांच्या निधनानं आपल्या घरातील एक ज्येष्ठ व्यक्ती हरपल्याची भावना संपूर्ण देशात निर्माण झाली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Ratan Tata : JLR ची सवारी ते एअर इंडियाची घरवापसी, रतन टाटांच्या नेतृत्त्वातील 5 महत्त्वाचे निर्णय
Ratan Tata : जेव्हा रतन टाटांना मिळाला होता लाच देण्याचा सल्ला, सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे उत्तर
Ratan-Tata-Started-Career-As-Worker-In-Tata-Group-Humble-Beginnings
Next Article
ज्या कंपनीचे मालक वडील, त्याच कंपनीत कर्मचारी म्हणून राबले रतन टाटा