जाहिरात

गुंतवणूकदारांच्या हितासाठी SEBI सरसावले, Futures & Options ट्रेडिंगवर निर्बंधांची घोषणा

गुंतवणूकदारांच्या हितासाठी SEBI सरसावले, Futures & Options ट्रेडिंगवर निर्बंधांची घोषणा
मुंबई:

शेअर बाजाराचं नियमन करणाऱ्या सेबी (SEBI) संस्थेनं गुंतवणूकदारांच्या हितासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सेबीनं मोठ्या जोखमीच्या फ्यूचर अँड ऑप्शंस (Future & Options) ट्रेडिंगवर निर्बंधाची घोषणा केली आहे. सेबीनं याबाबत नवं सर्कुलर जारी केलं आहे. 

काय आहेत निर्बंध?

सेबीनं जारी केलेल्या नव्या सर्कुलरनुसार 20 नोव्हेंबरपासून ऑप्शन बायिंग करण्यासाठीही आता पूर्ण पैसे आधी जमा करावे लागणार आहेत.सध्या ऑपश्न बायिंग करण्यासाठी तुम्हाला सगळे पैसे आधी भरावे लागणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक एक्सचेंजवर फक्त एकाच मेजर इंडेक्समध्ये आठवड्याच्या एक्स्पायरीचे कॉन्ट्रॅक्ट असतील. इतर सगळ्या इंडेक्समध्ये मंथली एकस्पायरीचे कॉन्ट्रॅक्ट असतील. यामुळे दररोज एका इंडेक्सची एक्सपायरी असल्यानं होणारं वारेमाप ट्रेडिंग कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय एका कॉन्ट्रॅक्टची मूळ किंमत 5 ते 10 लाखावरून 15 लाख ते 20 लाख करण्यात येणार आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

का होती गरज?

सेबीनं काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या आकडेवारीनुसार 30 वर्षांच्या खालील तरुणांचं फ्युच्यअर अँड ऑपश्न मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. गेल्या आर्थिक वर्षात ही संख्या 23 टक्क्यांवरुन 43 टक्क्यांवर पोहोचली होती.  ऑप्शन मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या 10 पैकी 9 जणांना तोटा होतो हे सत्य वारंवार सांगूनही या तरुणांना लागलेला ऑपश्न ट्रेडिंगचा नाद काही कमी झाला नव्हता. दरम्यान, गेल्या आर्थिक वर्षात ऑपश्न मार्केटमध्ये झालेल्या तोट्याची रक्कम तब्बल 1 लाख 80 हजार कोटींपर्यंत पोहचली होती.

EPFO च्या नियमात बदल, आता 50 हजार ऐवजी 1 लाख रुपये काढता येणार

( नक्की वाचा :  EPFO च्या नियमात बदल, आता 50 हजार ऐवजी 1 लाख रुपये काढता येणार )

आर्थिक सर्वेक्षणातून संकेत

कोव्हिडनंतर साऱ्या देशात फोफावलेल्या ऑप्शन ट्रेडिंगवर ( Option Trading) या बजेटमध्ये निर्बंध लादण्यात येतील असे संकेत या सर्वेक्षणातून मिळाले होते. एखादा माणूस जुगाराच्या आहारी जातो अगदी तसेच देशातील तरुण गुंतवणूकदार या ऑप्शन ट्रेडिंगच्या आहारी जात आहेत. या प्रकाराला आळा घातला नाही, तर भविष्यात लोकं शेअर बाजारात गुंतवणूक करणंच सोडून देतील अशी भीती आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली होती. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ
गुंतवणूकदारांच्या हितासाठी SEBI सरसावले, Futures & Options ट्रेडिंगवर निर्बंधांची घोषणा
adani-group-google-announce-clean-energy-tie-up-in-india
Next Article
अदाणी आणि Google मध्ये ऐतिहासिक करार, 'या' क्षेत्रात करणार एकत्र काम