जाहिरात

Share market Crash : शेअर बाजार आपटला; काय आहेत घसरणीची कारणे?

Share market News : दुपारी 3 वाजता सेन्सेक्समध्ये 1.61 टक्क्यांसह 1232 अंकांची घसरण झाली. तर निफ्टीमध्ये 1.40 टक्क्यांसह 327 अंकांची घसरण झाली.

Share market Crash : शेअर बाजार आपटला; काय आहेत घसरणीची कारणे?

शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये जवळपास दीड टक्क्याहून अधिक तर निफ्टीमध्ये जवळपास दीड टक्क्याची घसरण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपध घेतल्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात तेजी दिसत होती. मात्र काही वेळातच स्थिती बदलली आणि बाजारात घसरण सुरु झाली. सुरुवातीच्या बढतीनंतर दोन्ही प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स आणि निफ्टी जोरदार आपटले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दुपारी 3 वाजेपर्यंत, सेन्सेक्समध्ये 1.61 टक्क्यांसह 1232 अंकांची घसरण झाली. तर निफ्टीमध्ये 1.40 टक्क्यांसह 327 अंकांची घसरण झाली.  सकाळी बाजार उघडला त्यावेळी बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. जागतिक शेअर बाजारातील उत्साहाचा भारतीय शेअर बाजारावर देखील परिणाम दिसून आला. सेन्सेक्स 188.28 अंकांसह 77,261.72 अंकावर सुरु झाला. तर निफ्टी 76.90 अंकांच्या वाढीसह 23421 अंकांवर सुरु झाला. 

(नक्की वाचा-  मुंबईत घरांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट, निवडणुकीशी काय आहे कनेक्शन?)

शेअर बाजाराच्या घसरणीची कारणे? 

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादण्याची धमकी दिल्याने शेअर बाजाराची सेन्टिमेन्ट्स बदलले. त्याचा परिणाम बाजारावर झाला. डिसेंबरपासून कंपन्यांचे तिमाहीचे निकाल येत आहेत, ज्यामधील कामगिरी समाधानकारक नसल्याचं समोर आले आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांची निराशा  पाहायला मिळत आहेत. आत्तापर्यंतचे कंपन्यांचे तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत आहेत. 

(नक्की वाचा- 8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांचा होणार तिप्पट लाभ, वाचा किती वाढणार पगार?)

झोमॅटोच्या खराब निकालांमुळे न्यू एज शेअर्सबद्दलचे सेन्टिमेन्ट्सही बिघडले. याशिवाय बँक ऑफ जपान व्याजदर वाढवण्याची भीती आहे. बँक ऑफ जपान व्याजदरात वाढ केली तर गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यापासूनची ही पहिली वाढ असेल. यामुळे देखील गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. 

शेअर बाजारातील सततच्या विक्रीमुळे FII आधीच दबावाखाली आहेत.  HNI, किरकोळ गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग सुरु आहे. आजच्या घसरणीमध्ये मोठ्या प्रमाणावर स्टॉपलॉस देखील ट्रिगर होण्याची शक्यता आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: