
Share Market News : सलग तीन सुट्ट्यानंतर शेअर बाजार आज जोरदार तेजीत उघडला आहे. जागतिक बाजारपेठेतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आणि अमेरिकेने टॅरिफमध्ये दिलेल्या सवलतींच्या बातम्यांमुळे आज भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांमध्ये 2 टक्कांहून अधिक वाढ दिसून आली आहे. सेन्सेक्सने 1300 अंकांच्या वाढीसह 76,800 आणि निफ्टीने देखील 400 अंकांच्या वाढीसह23,300 चा टप्पा ओलांडला.
(नक्की वाचा- Navi Mumbai News: लग्नाची गडबड, 1 चूक अन् 14 लाखांचे दागिने गायब, पण पुढे आला खरा ट्वीस्ट)
बँकिंग आयटी, ऑटो, खाजगी बँका आणि टेरिफच्या भीतीने कोसळलेले सगळे शेअर्स आज जोरदार तेजीत बघायला मिळत आहेत. प्रशासनाने अतिरिक्त कराच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्याने जगभरातील बाजारांप्रमाणेच आज भारतीय बाजारात सुद्धा जोरदार तेजी दिसत आहे. मिडकॅप आणि विशेषतः रिअल इस्टेट स्टॉक्समध्येही आज तेजी आहे.
(नक्की वाचा- Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? नवी तारीख आली समोर, आता सुसाट प्रवास)
शेअर बाजारात तेजीचं कारण?
शेअर बाजारातील वाढीमागे कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक कल आणि अमेरिकेच्या टॅरिफ धोरणात मोठा बदल करण्यात आला आहे. अमेरिकन सरकारने स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरसारख्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंना शुल्कात सूट दिली आहे. यामुळे जागतिक टॅरिफ वॉरचा दबाव कमी झाला आणि त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवरही दिसून आला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world