
India-UK Sign Trade Pact : भारत आणि ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर एकमत झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांच्यातील चर्चेचनंततर दोन्ही देशांनी मुक्त व्यापार करार तसंच दुहेरी योगदान कराराला अंतिम रूप देण्याची घोषणा करण्यात आली. भारत आणि ब्रिटनने ऐतिहासिक यश म्हणून महत्त्वाकांक्षी आणि परस्पर फायदेशीर मुक्त व्यापार करार (FTA) यशस्वीपणे पार पाडल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हंटलं आहे की, 'भारत आणि ब्रिटनने दुहेरी योगदान करारासह महत्त्वाकांक्षी आणि परस्पर फायदेशीर मुक्त व्यापार करार यशस्वीपणे पूर्ण केला आहे. हा ऐतिहासिक करार आमची सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करतील आणि आमच्या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार, गुंतवणूक, वाढ, रोजगार निर्मिती आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देतील.
( नक्की वाचा : Indian Economy : भारत 2025 मध्ये चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार : IMF रिपोर्ट )
आपण ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांचं भारतामध्ये स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. दोन्ही नेत्यांनी या कराराचे द्विपक्षीय सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीतील ऐतिहासिक मैलाचा दगड असल्याचे वर्णन केले आहे. यामुळे दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार, गुंतवणूक, नवकल्पना आणि रोजगार निर्मितीला चालना देईल. जगातील दोन सर्वात मोठ्या आणि खुल्या बाजारपेठेतील अर्थव्यवस्थांमधील ऐतिहासिक करार कंपन्यांसाठी नवीन संधी उघडेल, आर्थिक संबंध मजबूत करेल आणि लोक-लोकांमधील संबंध अधिक दृढ करेल यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
Delighted to speak with my friend PM @Keir_Starmer. In a historic milestone, India and the UK have successfully concluded an ambitious and mutually beneficial Free Trade Agreement, along with a Double Contribution Convention. These landmark agreements will further deepen our…
— Narendra Modi (@narendramodi) May 6, 2025
पंतप्रधान कार्यालयानं (पीएमओ) या कराराबाबत माहिती सांगताना सांगितलं की, वस्तू आणि सेवांमधील व्यापारांचा समावेश असलेला हा एक न्याय आणि महत्त्वकांक्षी करार आहे. या करारामुळे द्विपक्षीय व्यापारात लक्षणीय वाढ होईल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, जीवनमान सुधारेल आणि दोन्ही देशांच्या नागरिकांचे सर्वांगीण कल्याण होईल, अशी आशा आहे.
पीएमओनं पुढं सांगितलं की, या कारारामुळे दोन्ही देशांना जागतिक बाजारपेठेसाठी संयुक्तपणे उत्पादने आणि सेवा विकसित करण्याची नवीन क्षमता देखील विकसित होतील. हा करार भारत आणि ब्रिटनमधील सर्वासमावेशक धोरणात्मक भागीदारीचा पाया आणखी मजबूत होईल तसंच सहकार्य आणि समृद्धीच्या युगाच्या नव्या मार्गाला चालना मिळेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world