जाहिरात

Hindenburg: हिंडनबर्ग बंद का झाली? कॉर्पोरेट जगातल्या जबरदस्त कमबॅकची 'मोसाद' लिंक

15जानेवारी 2025ला हिंडनबर्गचा रिपोर्ट सादर होऊन दोन वर्ष पूर्ण व्हायला फक्त सात दिवस उरलेले असतानाच हिंडनबर्ग रिसर्चनं आपलं दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला.

Hindenburg: हिंडनबर्ग बंद का झाली? कॉर्पोरेट जगातल्या जबरदस्त कमबॅकची 'मोसाद' लिंक
मुंबई:

अदाणी- हिंडनबर्ग यांच्या कायदेशीर लढाईत इस्रायली गुप्तचर एजन्सी मोसादच्या कार्यपद्धतीचा वापर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जानेवारी 2023 मध्ये हिंडनबर्गनं ऑपरेशन झॅपलिन या नावाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला. अहवालात अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणींवर गंभीर आरोप करण्यात आले. अदाणी समूहाच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स विषयी प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं. परिणाम अत्यंत गंभीर होता. अदाणी समूहाच्या बाजारमूल्यापैकी 150 अब्ज डॉलरचं नुकसान झालं. त्यामुळे समूहाचं बाजारमूल्य आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर पोहचलं. अदाणींचं समूहाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. पण अस्तित्वाच्या याच निकराच्या लढाईच्या क्षणी अदाणींनी अत्यंत संयमी आणि थंड डोक्यानं विचार केला आणि हिंडनबर्गच्या निराधार आरोपांना उत्तर देण्यासाठी प्रतिहल्ल्याची रणनीती आखली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हिंडनबर्गनं केलेले अपहार आणि भ्रष्टाचाराचे आरोप अदाणी समूहानं पहिल्या दिवसापासून फेटाळले. त्यानंतर तगडी जनसंपर्क , मजबूत कायदेशीर आराखाडा आणि परराष्ट्रीय संबंध अशा विविध पातळ्यांवर हिंडनबर्गच्या आरोपांना धुळीला मिळवण्याची रणनीती आखली गेली.सगळ्या पातळ्यांवर प्रतिहल्ला करण्याच्या या रणनीतीचा फायदा अदाणी समूहाला झाला. गुंतवणूकादारांचा विश्वास परत मिळवण्यात अदाणी समूह यशस्वी झाला. पण हा विश्वास परत मिळवण्यासाठी अदाणी समूहानं एक गुप्त मिशन चालवलं आणि त्यासाठी इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादचाही हातभार लागला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ट्रेंडिंग बातमी - Big News: चीनने अरुणाचल प्रदेशच्या 22 ठिकाणांची परस्पर बदलली नावं, मुख्यमंत्री म्हणतात हा तर...

अदाणी समूहावर शेअरच्या किंमती वर खाली करण्याचा आणि ताळेबंदात घोटाळा करुन पैसे हडप केल्याचा आरोप हिंडनबर्गच्या अहवालात होता. अहवाल ज्या दिवशी प्रकाशित झाला, त्यानंतर अवघ्या सात दिवसांनी इस्रायलच्या हायफा बंदराच्या पुरुज्जीवनाचे कंत्राट अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनोमिक झोन्सला मिळलं होतं. अदाणी स्वतः 1.2 अब्ज डॉलरचं हे कंत्राट स्विकारण्यासाठी इस्रायला गेले होते. तत्कालीन पंतप्रधान बेजामीन नेतत्याहूही कराराच्या वेळी उपस्थित होते.'हायफा पोर्ट' चं पुनरुज्जीवन हे इस्रायलसाठी अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प होता. 2020मध्ये या बंदराचा विकास करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात जगभरातून एकूण 18 कंपन्यांनी निविदा भरल्या. त्यापैकी फक्त 5 कंपन्या निवडण्यात आल्या. इस्रायलच्या अत्यंत जाचक संरक्षण निकषांचे अडथळे पार करुन अदाणी समूहानं हायफा पोर्टचं कंत्राट अदाणी समूहानं मिळावलं. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास 18 महिने लागले. निविदा जिंकल्यावर इस्रायलची फर्म गोदात मोसिफिन फॉर केमिकल्स लिमिटेड आणि अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनोमिक झोन्स लिमिटेड या दोन कंपन्यांनी हायफा बंदराची बांधणी करण्याचा विडा उचलला. अदाणी समूहाच्या कंपनीचा नव्या कंपनीत अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा होता.

ट्रेंडिंग बातमी - Cabinet meeting: मत्स्य व्यवसायाला "कृषीचा दर्जा", कॅबिनेटचा मोठा निर्णय, 'हे' मिळणार फायदे

दरम्यान हिंडनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यावर हायफा बंदरावरच्या एका खोलीत त्याला उत्तर देण्याची रणनीती आखण्यात आली. या बैठकीला उपस्थित गौतम अदाणींना इस्रायली अधिकाऱ्यांनी आरोपात तथ्य किती असा सवाल केला. हिंडनबर्गनं केलेले सगळे आरोप खोटे आहे असं अदाणींनी स्पष्टपणे सांगितलं. यावेळी तिथे मोसादचा एक बडा अधिकारी आणि हायफा बंदराचे मावळते प्रमुख इशेल अर्मोनि उपस्थित होते.इस्रायली शासन व्यवस्थेतील काही अधिकाऱ्यांना हिंडनबर्गचा अहवाल हा हायफा बंदराच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प धुळीला मिळवण्याचा प्रयत्न होता. सामरिक आणि व्यापारी दृष्टीनं हायफा बंदर इस्रायलसाठी अत्यंत महत्वाचं आहे. भारत मध्यपूर्व आशिया युरोप व्यापारी मार्गासाठीही हायफा बंदर महत्वाचं आहे जेणे करुन चीनच्या वाढत्या प्रभावाला उत्तर देणे शक्य होईल.

Pahalgam Terror Attack : 'भेळपूरी खात होतो, दहशतवाद्यांनी थेट गोळ्या झाडल्या', पर्यटकांनी सांगितला अनुभव )

इकडे भारतात अदाणी समूहानं ढासळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी कर्जाची परतफेड सुरु केली. अनेक कर्ज मुदतीपूर्वी फेडली. अनेक कर्जरोख्यांचे पैसे रोख परत दिले. गौतम अदाणी स्वतः तारण ठेवलेले कोट्यवधींच्या शेअर्स सोडवून घेतले. आणि मुख्य व्यवसायवर लक्ष केंद्रीत केलं.हिंडनबर्गला प्रत्त्युतर देण्यासाठी ऑपरेशन झॅप्लिन आखण्यात आलं. ऑपरेशनच्या माध्यमातून हिंडनबर्ग ही संस्था नेमकं कसं काम करते याचा शोध घेण्यात आला. याच गुप्त शोध महिमेतून हिंडनबर्गचा बोलविता धनी नेमका कोण होता याचाही शोध घेण्यात आला. हिंडनबर्ग आणि त्याचा संस्थापक नॅथन अँडरसनवर पाळत ठेवण्यात आली. माजी गुप्तहेरांनी यातून काही अदृश्य बिंदू जोडण्यास सुरुवात केली. अत्यंत गुंतागुंतीच्या संबंधांचं एक मोठं जाळं त्यातून पुढे आलं. त्यात वकील, पत्रकार, हेज फंड आणि काही राजकीय व्यक्तींचा समावेश होता. त्यापैकी काहींचा चीनशीही संबंध असल्याचं पुढे आलं. उरलेले काही जण वॉशिंग्टनमधील सत्ता बाजारातील महत्वाच्या व्यक्ती होत्या.

ट्रेंडिंग बातमी - Pahalgam Terror Attack : 'एकही दहशतवादी सोडणार नाही,' पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींनी खडसावलं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही गुप्तहेरांनी शिकागोच्या जवळ असणाऱ्या अँडरसनच्या ओकब्रूक टेरेस या छोट्याशा कंपाऊंडमध्येही घुसून भारत, अमेरिका, युरोप, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया देशातील काही कार्यकर्त्यांमधील एन्क्रिप्टेड संदेश मिळवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या ऑपरेशनबद्दल अदाणींना कल्पना देण्यात आली. त्यासाठी अदाणी एका खासगी दौऱ्यावर स्वित्सझर्लंडला गेलेले असताना एक गुप्त बैठकही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे सगळं जानेवारी 2024मध्ये घडलं. त्यावेळी अदाणींनी तात्काळ कोणताही पाऊल उचललं नाही. पण देण्यासाठी रणनीती आखली. वकीलांची आणि गुप्तचर सल्लागारांची एक टीम तयार केली. अमेरिकेत आधीच ठेवण्यात येत असलेल्या पाळत ठेवण्याच्या कामातून जी माहिती पुढे येत होती, त्याचा योग्य वापर कसा करता येईल यावर वकील आणि सल्लागांरांची टीम बारकाईनं काम करत होती.  अतिमहत्वाच्या व्यक्तींना या सगळ्या ऑपरेशनची माहिती देण्यात आली. या ऑपरेशनसाठी अहमदबादमध्ये एक हायटेक कंट्रोलरुम स्थापन करण्यात आली. त्यात सायबर एक्सपर्ट आणि अनेक डेटा अनॅलिस्ट काम करु लागले. अदाणींच्या कायदेतज्ज्ञांचा टीम जगातील इतर देशांच्या राजधानीच्या शहरात बसून एका विशेष रणनीती अंतर्गत काम करत राहीली.

ट्रेंडिंग बातमी -  Sharad Pawar : पवार आणि ठाकरे कुटुंब एकत्र येतंय? सर्व चर्चांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

ऑक्टोबर 2024मध्ये, अदाणींविरुद्ध रचण्यात आलेल्या षडयंत्राचा लेखाजोखा मांडणारा एका 353 पानी अहवाल तयार झाला. त्याच वर्षी पुढे अमेरिकन गुप्तचर यंत्रणा आणि अदाणींविरोधी षडयंत्रात सामील असणाऱ्या मीडिया कंपन्याचे संबंधही उघड झाल्याचं सूत्रांनी म्हटलंय. नोव्हेंबर 2024च्या शेवटी शेवटी अमेरिकन विधी विभाग आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशननं गौतम अदाणी आणि अदाणी समूहातील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर लाचखोरीचे आरोप केले. अदाणींनी हे आरोप सुद्धा फेटाळले. दुसरीकडे अदाणी समूहानं नॅथन अँडरसन आणि हिंडनबर्गविरोधात कायदेशीर कारवाईला सुरुवात केली. एक सात पानी कायदेशीर अहवाल तयार करण्यात आला. त्यासाठी व्हाईट शू लॉ फर्मला काम देण्यात आलं होतं. हा अहवाल अँडरसनच्या कार्यालयाला पाठवण्यात आला. अदाणींचे कायदेशीर सल्लागार आणि हिंडनबर्गच्या अधिकाऱ्यांमध्ये एक बैठकही बोलवण्यात आली. ही बैठक मॅनहॅटनमधील 295 अॅव्हेन्यूच्या टेक्सटाईल बिल्डिंग होणार होती. पण ती बैठक झाली की नाही याबद्दल कोणतीही पुष्टी मिळाली नाही.

ट्रेंडिंग बातमी - Cabinet meeting: मत्स्य व्यवसायाला "कृषीचा दर्जा", कॅबिनेटचा मोठा निर्णय, 'हे' मिळणार फायदे

15जानेवारी 2025ला हिंडनबर्गचा रिपोर्ट सादर होऊन दोन वर्ष पूर्ण व्हायला फक्त सात दिवस उरलेले असतानाच हिंडनबर्ग रिसर्चनं आपलं दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन झॅप्लिन सारखं ऑपरेशन याआधी घडल्याचं ऐकिवात नाही. या ऑपरेशनमध्ये असे अनेक अनोखी पैलू आहेत जे कधीच जगासमोर येणार नाहीत. पण एक मात्र नक्की फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्यासाठी एखाद्या व्यावसायिकानं घेतलेलं उचलंलं हे इतिहातलं सर्वात कठोर पाऊल असेल हे नक्की.