पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज WAVES 2025 समिटचं उद्घाटन केलं. यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह बॉलिवूड आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. व्हेव्ज हा केवळ शब्द नाही तर ही एक लाट आहे, अशा शब्दात या कार्यक्रमाचं वर्णन केलं आहे.
पाकिस्तानच्या ISI एजंटला राजस्थानमध्ये अटक
पाकिस्तानच्या ISI एजंटला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली आहे. जैसलमेरमध्ये ही कारवाई करण्यात आली. भारतीय गुप्तचर विभागाने ही कारवाई केली. पकडलेली व्यक्ती ही पाकिस्तानची खबरी असल्याचं सांगितलं जात आहे. भारतातील महत्वाची माहिती तो पाकिस्तानला देत होता.
सोलापुरात आज तापमानाने गाठला उच्चांक
सोलापुरात आज तापमानाने गाठला उच्चांक
सोलापुरात 44.1 ° सेल्सियस तापमानाची झाली नोंद
दिवसेंदिवस तापमान उच्चांकाचे मोठं मोठं गाठत आहे विक्रम
वाढत्या तापमाणामुळे सोलापूरकरांची झाली लाहीलाही
संभाजी नगरच्या चिकलठाणा एमआयडीसी परिसरात आग
संभाजी नगरच्या चिकलठाणा एमआयडीसी परिसरात स्टिकर बनवणाऱ्या कंपनीला आग लागलीय, कंपनीत पेपर असल्यामुळे आग भडकली आहे. अग्निशमन विभागाचे सहा बंब आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे.
Live Update : मनोज जरांगे यांची तब्येत खालावली
मनोज जरांगे यांची तब्येत खालावली
बीड दौऱ्यावर असताना जरांगेंची तब्येत खालावली
जरांगेंना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात हलवले
जरांगे यांच्यावर उपचार सुरू
ऊन लागल्याने जरांगे यांना चक्कर येत होते
Live Update : पहलगाममधील दहशतवाद्यांनी मार्गक्रमण आणि संवाद साधण्यासाठी वापरले दोन अॅप्स
पहलगाममधील दहशतवाद्यांनी मार्गक्रमण आणि संवाद साधण्यासाठी वापरले दोन अॅप्स
१) अल्पाइन क्वेस्ट - हे ॲप वापरकर्त्यांना ऑफलाइन मोडमध्ये मोबाइल नेटवर्क किंवा इंटरनेट कनेक्शनशिवाय लोकेशन प्री-फीड करण्याची आणि त्यावर पोहोचण्याची परवानगी देते.
२) अल्ट्रा - हे एक एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन सिस्टम आहे जे सुरक्षा दलांना क्रॅक करण्यात अयशस्वी ठरले आहे.
Live Update : WAVES 2025 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात
Live Update : WAVES 2025 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात
Live Update : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास NIA कडे, DG सदानंद दाते पहलगामला पोहोचले
Live Update : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास NIA कडे, DG सदानंद दाते घटनास्थळी जाऊन करणार तपास
Live Update : पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील 3 अधिकारी, 2 कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक जाहीर
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 800 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे.
-त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील तीन अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
-पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, विठ्ठल साळुंखे, सुहास आव्हाड यांना महासंचालक पदक जाहीर झाले आहे. पोलीस हवालदार विकास राठोड आणि नितीन ढोरजे यांना देखील हे पदक जाहीर झाले आहे
-महाराष्ट्र पोलीस दलामध्ये विविध प्रकारच्या प्रवर्गात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक, शौर्य पदक प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह दिले जाते. यावर्षी 180 अधिकारी आणि 620 कर्मचाऱ्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे
Live Update : अमूल, गोवर्धन आणि मदर डेरी कंपनीच्या दुधाच्या किमतीत वाढ
अमूल, गोवर्धन आणि मदर डेरी कंपनीच्या दुधाच्या किमतीत वाढ
एका लिटरमागे दोन रुपयांनी वाढ
Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 100 दिवसांच्या कार्यक्रमांचा निकाल जाहीर
राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2025
गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक… pic.twitter.com/8IfRVry1jb
Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 100 दिवसांच्या कार्यक्रमांचा निकाल जाहीर
Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 100 दिवसांच्या कार्यक्रमांचा निकाल जाहीर
Live Update : मुंबईतील हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेट
मुंबईतील हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेट
Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा...
भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या, महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी…
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2025
Live Update : थोड्याच वेळात WAVES परिषदेची होणार सुरुवात, पंतप्रधान मोदी साधणार संवाद
Live Update : राहुल गांधींकडून महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिनाच्या शुभेच्छा
Greetings and best wishes to the people of Maharashtra and Gujarat on their Foundation Day!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 1, 2025
The rich histories and vibrant cultures of these states are a true testament to India's strength. Their invaluable contributions have always played a pivotal role in shaping our nation’s… pic.twitter.com/FYcJqWSaj4
Live Update : ॲडव्होकेट अमृत अधिकारी यांचे मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन
पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ विधीज्ञ आणि समाजवादी कार्यकर्ते ॲडव्होकेट अमृत अधिकारी यांचे मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. ॲडव्होकेट अमृत अधिकारी यांच्या निधनाने पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील एक अभ्यासू , तत्त्वनिष्ठ आणि गोरगरीब, अदिवासी, बहुजनांना प्रामाणिकपणे न्याय मिळवुन देणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व हरपल्याने जिल्हावासीयांकडून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुलं,भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे.
Live Update : महाराष्ट्र दिनानिमित्ताने मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
Mumbai | Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis says, "Maharashtra Day is an important day for India's most progressive state. Maharashtra, which follows the path shown by Chhatrapati Shivaji Maharaj and Babasaheb Ambedkar, is determined not to stop. Our effort is to make… https://t.co/IHHwvSj5qJ pic.twitter.com/ZVpAV2NV6l
— ANI (@ANI) May 1, 2025
Live Update : मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आज निकाल
मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आज निकाल
48 विभागांना कार्यालयीन कामाबाबत टार्गेट
40 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विभागांची घेणार दखल
अव्वल विभागाचा सरकारकडून होणार सत्कार
Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, बीकेसीमधील वेव्हज समिटचं करणार उद्घाटन, मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त
Live Update : पुण्यातील बहुप्रतिक्षीत सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा
पुण्यातील बहुप्रतिक्षीत सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा
उपमुख्यमंत्री अजित पवार आज करणार उड्डाणपुलाचं उद्घाटन
विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटरपर्यंत जवळपास 2100 मीटरच्या उड्डाणपुलाचा आज लोकार्पण सोहळा
उड्डाणपुलामुळे मोठी वाहतूक कोंडी टळणार
सिंहगड रोडवरच्या वाहतुकीतून पुणेकरांची होणार सुटका
अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील देखील राहणार उपस्थित
Live Update : महाराष्ट्र थांबणार नाही हा निर्धार - मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्र दिनानिमित्ताने शुभेच्छा..
महाराष्ट्र हे भारतातील सर्वात पुरोगामी राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गांवर चालणारा महाराष्ट्र थांबणार नाही हा निर्धार आहे. ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. 100 दिवसाचा उपक्रमाचा तपशील लवकरच मिळेल