Baiga Tribe news: मध्य प्रदेशातील बालाघाटामधील जगृती बाई या आदिवासी महिलेनं 10 व्या मुलाला जन्म दिलाय. डॉक्टरांनी योग्य उपचार केल्यानं आई आणि बाळ दोघांचीही तब्येत चांगली आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण, या महिलेची वय फक्त 35 वर्ष आहे. तिच्या पहिल्या मुलगी 22 वर्षांची आहे.
10 व्या मुलाच्या डिलिव्हरीसाठी ती हॉस्पिटलमध्ये आली त्यावेळी मुलाचा हात बाहेर आला होता. ती अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये होती. मुलीचं गर्भाशय काढावं लागेल अशी परिस्थिती झाली होती. डॉ. अर्चना लिल्हारे आणि त्यांच्या टीमनं कौशल्यानं ऑपेरशन करत या महिलेची प्रसूती केली. आनंदाची बातमी म्हणजे या महिलेचं गर्भाशय काढण्याची गरजही लागली नाही. सिव्हिल सर्जन डॉ. निलय जैन येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये 30 वर्षांपासून काम करत आहेत. पण, आजवर कोणत्याही महिलेनं 10 व्या मुलाला जन्म दिल्याची घटना त्यांनी पाहिलेली नाही. हा अत्यंत दूर्मीळ प्रकार आहे, असं त्यांनी सांगितलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहेत जगृती बाई?
जगृती बाई या बैगा या आदिवासी समाजातील आहेत. मोहगावमधील त्या रहिवाशी आहेत. त्यांना प्रसुती वेदना सुरु झाल्या त्यावेळी परिसरातील आशा कार्यकर्त्या रेखा कटरे यांनी त्यांना बिरसा येथील आरोग्य केंद्रात नेलं.जगृती बाई यांच्या मुलाचा हात गर्भात बाहेर येत होता. त्यामुळे त्यांची केस नाजूक होती. त्यामुळे आरोग्य केंद्रानं त्यांना जिल्हा हॉस्पिटलमध्ये जाण्याची सुचना केली. जिल्हा हॉस्पिटलमध्ये त्यांच्या दहाव्या मुलाचा जन्म झाला.
जगृती बाईंचं ऑपेशन करणं अतिशय आव्हानात्मक होतं, असं डॉ. अर्चना यांनी सांगितलं. जगृती बाईंना प्रसुतीसंबंधी किंवा सोनोग्राफीबाबत काहीही माहिती नव्हती. त्यांचा नवराही त्यांच्याबरोबर नव्हता. त्यामुळे ऑपेशन करण्यासाठी त्यांना सीएसएमओची परवानगी घ्यावी लागली. आई आणि बाळ सुखरुप असल्याचं डॉ. अर्चना यांनी सांगितलं. जगृती बाई या नामशेष होत असलेल्या बैगा या समाजातील आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांची नसबंदी करण्याची परवानगी नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं.
बैगा समाज का खास आहे?
बैगा हा नामशेष होत असलेल्या समाजापैकी एक आहे. |
या समाजाच्या संरक्षणासाठी सरकारनं अनेक योजना केल्या आहेत. |
मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि उत्तर प्रदेशात वास्तव्य |
मध्य प्रदेशातील मंडला, शहडोल आणि बालाघाट या जिल्ह्यात हा समाज आढळतो |
शेती, मजूरी आणि झाड-पाल्यांनी इलाज करणे ही या समाजाची कामं |
- या समाजातील महिला संपूर्ण शरिरावर टॅटू काढतात |
7 मुलं आणि 3 मुलींना जन्म
आशा कार्यकर्त्या रेखा कटरे यांनी दिलेल्या माहितीनुसार जगृती बाईंचा नवरा अकलूसिंह मरावी कामासाठी बाहेरगावी गेलाय. त्यांच्याबरोबर त्यांची दोन मुलंही गेले आहेत. 35 वर्षांच्या जगृती बाईंनी 13 व्या वर्षी पहिल्या मुलीला जन्म दिला. ही मुलगी सध्या 22 वर्षांची असून तिचंही लग्न झालंय. त्यानंतर तिला 13 वर्षांचा आणि 9 वर्षांचा मुलगा आहे. 8 वर्षांची मुलगी, 6 वर्षांचा मुलगा, 3 वर्षांचा मुलगा आणि एक दिवसाचा मुलगा आहे. जगृती बाईंच्या दुसऱ्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकाच्या मुलाचा जन्मल्यानंतर दोन ते तीन महिन्यांमध्ये मृत्यू झाला.
(नक्की वाचा : मुस्लीम महिलांना पोटगीचा अधिकार मिळताच शाहबानो खटला आणि राजीव गांधींची पुन्हा चर्चा का? )
अतिशय गरीब कुटुंब
रेखा कटरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबाची आर्थिक स्थिती अतिशय हालाखीची आहे. हॉस्पिलमधून सुट्टी घेतल्यानंतर जगृती बाईंना राहण्याची निश्चित जागा नाही. त्या 6 मुलं शेजाऱ्यांकडं ठेवून हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडं सरकारची कोणतीही कागदपत्र नाहीत.
आदिवासींच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष दिनेश धुर्वे यांनी सांगितलं की, 'माझ्या माहितीनुसार आमच्या समाजातील हे पहिलंच प्रकरण आहे. ही एक सामाजिक समस्या आहे. आम्ही त्या विषयावर काम करत आहोत. सरकारच्या कुटुंब नियोजन विभागानंही या विषयावर अधिक काम करण्याची गरज आहे. ही एक संरक्षित जनजाती आहे. त्याचं संरक्षण आणि विस्तार होण्याची गरज आहे.
( नक्की वाचा : ना नवरा, ना वरात, तरीही इथं मुली करतायत लग्न, काय आहे प्रकार? )
या समाजात जागरुकता कमी आहे. सरकार त्यांना कोणती सुविधाही देत नाही. सरकारनं या समाजातील कुणाची नसबंदी केली जाणार नाही हा नियम केलाय. पण, त्याच्या पर्यायी उपाययोजना केलेल्या नाहीत, असं दिनेश यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world