जाहिरात
This Article is From May 07, 2024

पालकांना खडबडून जागं करणारा VIDEO, राजस्थानात 4 वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण 

लविश कुमार असं अपहरण झालेल्या मुलाचं नाव आहे. लविश 5 मे रोजी वडिलांसोबत फिरोजाबादला जाण्यासाठी कोटा रेल्वे स्टेशनला गेला होता.

पालकांना खडबडून जागं करणारा VIDEO, राजस्थानात 4 वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण 

राजस्थानच्या कोटामधून चार वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. मुलाचं अपहरण करतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत, मात्र त्यांच्या हाती अद्यापही अपहरणकर्त्याबाबत ठोस पुरावा सापडलेला नाही. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, 5 मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी कोटा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात अपहरणकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजसोबत टेक्निकल टीमची देखील मदत घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लविश कुमार असं अपहरण झालेल्या मुलाचं नाव आहे. लविश 5 मे रोजी वडिलांसोबत फिरोजाबादला जाण्यासाठी कोटा रेल्वे स्टेशनला गेला होता. तिथे रेल्वेचा वाट पाहत असताना लविश अचानक गायब झाला. आजूबाजूल शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. त्यानंतर वडिलांनी लविशच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांना नोंदवली. 

नक्की वाचा- शिवीगाळ, दमदाटी, धमकी; माझ्याशिवाय आहे कोण? अजित पवार गटाच्या आमदाराची दादागिरी, VIDEO

कोटा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरुन लविश गायब झाला होता. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, अपहरणकर्ता लविशला खांद्यावर उचलून घेऊन जात आहे. आरोपी टॅक्सी स्टँडवर देखील बराच वेळ थांबला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी टीम देखील तयार केल्या आहे. लवकरात लवकर आरोपीला अटक करण्याठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com