जाहिरात

Accident News:धक्कादायक! दोन भीषण अपघातांमध्ये 34 जणांचा मृत्यू, त्या 15 जणांची देवउठनी एकादशी ठरली शेवटची

Accident News: तेलंगणा आणि राजस्थान राज्यामध्ये घडलेल्या भीषण अपघातामंध्ये एकूण 34 लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

Accident News:धक्कादायक! दोन भीषण अपघातांमध्ये 34 जणांचा मृत्यू, त्या 15 जणांची देवउठनी एकादशी ठरली शेवटची
"Accident News: तेलंगणा आणि राजस्थानमध्ये भीषण अपघात"
PTI

Accident News: तेलंगणा आणि राजस्थानमध्ये झालेल्या वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये एकूण 34 जणांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात ट्रक आणि बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत 19 जणांचा मृत्यू झालाय तर चार जण जखमी आहेत. चेवेल्ला शहराजवळ तेलंगणा रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या (आरटीसी) बसला ट्रकची धडक बसली आणि ट्रकमधील खडी बसवर पडली. पोलिसांनी पीटीआय भाषाला दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (3 नोव्हेंबर) झालेल्या अपघातामध्ये 19 लोक मृत्यूमुखी पडले आहेत, ज्यामध्ये 10 महिलांचा समावेश आहे. अपघातामुळे जखमींना जबरदस्त धक्का बसलाय. बसवर खडी पडल्याने अनेक प्रवासी बसमध्ये अडकले होते. अधिकाऱ्यांनी यंत्रसामग्रींचा वापर करून बचावकार्य सुरू केले आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

10 महिलांसह चार लहान मुलांचा मृत्यू | Rajasthan Accident News

राजस्थानमधील फलोदी जिल्ह्यातही रविवारी (2 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात 10 महिलांसह चार मुलांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचा एकूण आकडा 15 असल्याची माहिती समोर आलीय. अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जोधपूरचे पोलीस आयुक्त ओम प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतमाला महामार्गावर जोधपूर जिल्ह्यातील मतोडा गावाजवळ ही दुर्घटना घडली.  

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

15 प्रवाशांचा जागीच मृत्यू, देवउठनी एकादशी ठरली शेवटची | Accident On Devuthani Ekadashi 2025 Day

15 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, अपघातामध्ये दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृत पावलेले सर्वजण जोधपूरमधील नैनची बाग परिसरातील रहिवासी होते. देवउठनी एकादशीनिमित्त बीकानेर जिल्ह्यातील कोलायत  शहरातील कपिल मननी आश्रमामध्ये पूजाअर्चना करून परतत असताना हा अपघात झाला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय.

(नक्की वाचा: Nalasopara Accident: भरधाव ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, बाप-लेकाचा जागीच मृत्यू, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रेलरला धडक

प्रत्यक्षदर्शी महिपाल सारण यांनी सांगितले की, भारतमाला महामार्गालगत कित्येक छोटे-छोटे ढाबे आहेत. या ढाब्यांसमोरच एक ट्रेलर उभा होता. भरधाव येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की टेम्पो ट्रॅव्हलरच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला, या अपघातानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला.  

(नक्की वाचा: Pune Accident CCTV Footage: पुण्यात भीषण अपघात.. दोन भावांचा मृत्यू, कारचे तुकडे, हादरवणारा VIDEO)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

ओसिया उपजिल्हा हॉस्पिटलचे प्रभारी डॉ. प्रदीप सिंह चौधरी यांनी सांगितले की, सर्व मृतदेह जोधपूरच्या मथुरादास माथुर हॉस्पिटल आणि महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

(Content Source: PTI Bhasha)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com