
Updates of India Pakistan Attack, Terrorist : नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतामधील कोणतीही दहशतवादी कारवाई ही यापुढे युद्ध समजली जाईल. कोणताही देश युद्धामध्ये शत्रूला ज्या पद्धतीने उत्तर देतो तसेच उत्तर अशा दहशतवादी कारवायांनाही दिले जाईल. दहशतवाद हा मुद्दाम केलेला हिंसाचार असतो ज्याचा मूळ उद्देश हा लोकांमध्ये भय निर्माण करणे आणि त्यांच्या जिवीताला हानी पोहोचवण्याचा असतो. बॉम्बस्फोट घडवून आणणे, गोळीबार, विमान अपहरण, सायबर हल्ला ही सगळी कृत्ये अॅक्ट ऑफ टेररमध्ये समाविष्ट आहेत. सरकारी ठिकाणे लक्ष्य करणे आणि सैन्याच्या तळांवर अथवा छावण्यांवर हल्ले करणे हे देखील यामध्ये समाविष्ट आहे.
नक्की वाचा :26 वर्षांनी बदला, ऑपरेशन सिंदूरमध्ये खात्मा! भारताला हादरवणाऱ्या 'कंदहार हायजॅक'ची स्टोरी
काही देश दहशतवादाला खतपाणी घालत असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास पाकिस्तानचे देता येईल. पाकिस्तान त्यांच्या देशातील तसेच भारतातील लोकांची माथी भडकावून भारताच्या भूमीवर दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो. भारतामध्ये बेदिली माजावी, अस्थिरता निर्माण व्हावी, इथल्या लोकनियुक्त सरकारला धोका निर्माण व्हावा, भारतामध्ये मोठी जिवीत अथवा आर्थिक हावी व्हावी यासाठी या दहशतवादी कारवाया घडवून आणल्या जातात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीय घटना आणि आंतरराष्ट्रीय कायदे, कोणत्याही देशाला स्वसंरक्षणाचा अधिकार देतात. हा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील कलम 51 नुसार स्वसंरक्षणाच्या अधिकाराशी सुसंगत आहे. भारतीय घटनेच्या कलम 14 (कायद्यापुढे समानता) आणि कलम 21 (जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकार) हे अधिकार देण्यात आलेले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही कलमे महत्त्वाची आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world