जाहिरात
This Article is From May 10, 2024

मोठा बातमी! अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर

अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत जामीन मंजूर झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. 

मोठा बातमी! अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. 1 जूनपर्यंत केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. आज संध्याकाळपर्यंत केजरीवाल बाहेर येण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या सुटकेने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्चला अटक केली होती. मागील 50 दिवसांपासून ते तुरुंगात आहेत. सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल यांना हा अंतरिम जामीन सुप्रिम कोर्टाने मंजूर केला आहे.

(नक्की वाचा- नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का? अजित पवार गटाचा बडा नेता शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात)

अरविंद केजरीवाल यांनी जुलैपर्यंत जामीन मिळावा अशी विनंती कोर्टाला केली होती. मात्र 1 जूनपर्यंतच जामीन मंजूर झाल्याने केजरीवाल यांना 2 जून रोजी पुन्हा तुरुंगात जावं लागणार आहे.

आजच तुरुंगातून बाहेर येणार?

मिळालेल्या माहितीनुसार, अंतरिम जामीन मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर ट्रायल कोर्टात पाठवली जाईल. त्यानंतरा ट्रायल कोर्ट सुटकेचा आदेश तिहार तुरुंग प्रशासनाला पाठवेल. त्यानंतर केजरीवाल यांची सुटका केली जाईल. तिहार तुरुंगात दररोज ज्या रिलीज ऑर्डर येतात, त्या तासाभरात मंजूर केल्या जातात. त्यामुळे अरविंद केजरीवाल आजच तुरुंगातून बाहेर येण्याची दाट शक्यता आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: