बच्चू कडू यांच्यासह 23 आंदोलनकर्ते उपोषणकर्त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय दहा कार्यकर्त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. बच्चू कडू यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. गेल्या सात दिवसात बच्चू कडू यांच्या वजनात सात किलोने घट झाली असून बच्चू कडू यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होत आहे. रक्तांच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. लघवीमध्ये मोठ्या प्रमाणात कीटोन्स आढळल्याची डॉक्टरांची माहिती आहे. पुढील 24 तास महत्त्वाचे असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
माथेरानच्या शॉरलेट लेकमध्ये तिघे जण बुडाले
माथेरानच्या शॉरलेट लेकमध्ये तिघे जण बुडाले
बुडालेले तिन्ही पर्यटकांचे मृतदेह काढण्यात यश.
नवी मुंबई येथे राहणारे तिघे पर्यटक माथेरान च्या शेर्लॉट लेक मध्ये बुडाले.
सुमित चव्हाण 16, आर्यन खोब्रागडे 19, फिरोज शेख 19 नवी मुंबई तील पर्यटक आले होते माथेरान फिरायला.
पोलिस कर्मचारी, माथेरान मधील सह्याद्री रेस्क्यू टीम, खोपोलीतील हेल्प फॉउंडेशन टीम कडून तिन्ही बॉडी मिळवण्यात यश.
माथेरान चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनावणे आणि टीम कडून सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालय, माथेरान येथे ठेवण्यात येत आहेत.
सोनिया गांधींना सर गंगाराम रुग्णालयात करण्यात आलं दाखल
सोनिया गांधींना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना पोटाचा आजार असल्याने दाखल करण्यात आलं आहे. त्यांना गॅस्ट्रो विभागात दाखल करण्यात आलं आहे. एएनआयने ही बातमी दिली आहे.
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी, 38 जणांना वाचवलं
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाले आहे. आतापर्यंत 38 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अजून ही बचावकार्य सुरू आहे.
पंतप्रधान मोदींनी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची घेतली माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सायप्रस येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करून पुणे जिल्ह्यातील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची माहिती घेतली आणि या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या मदतकार्यात राज्य सरकारला सर्व ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
पूल कोसळण्याची घटना खेदजनक - शरद पवार
पूल कोसळण्याची घटना खेदजनक असल्याची प्रतिक्रीया शरद पवार यांनी दिली आहे.
मावळच्या कुंडमळानजीक इंद्रायणी नदीवरील जीर्ण पादचारी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेत काही पर्यटक वाहून गेल्याची, जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे, हे अतिशय खेदजनक आहे. उपस्थित पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा व NDRF तर्फे बचावकार्य सुरु आहे, त्याद्वारे अनेकांना वाचविण्यात…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 15, 2025
जून्या पूलांचे ॲाडिट करण्याचे एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांना फोनकरून राज्यातील सर्व जून्या पूलांचे ॲाडिट करण्याचे दिले आदेश.
पुणे जिल्ह्यातील दूर्घटनेनंतर राज्यातील सर्व जून्या पूलांचे होणार स्ट्रक्चरल ॲाडिट. पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारीची सूचना.
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतील मृतांना 5 लाखांची मदत जाहीर
पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 15, 2025
CM Devendra…
Live Update : पूल दुर्घटनेचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतला आढावा
पूल दुर्घटनेचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आढावा घेतला आहे.
Deeply saddened by the tragic incident of the bridge collapse on the Indrayani River in Talegaon, Pune. Spoke with Maharashtra Chief Minister Shri Devendra Fadnavis and inquired about the present situation on the ground. NDRF teams posted nearby quickly rushed to the site, joined…
— Amit Shah (@AmitShah) June 15, 2025
38 व्यक्तींना वाचवण्यात यश तर 18 जण जखमी
मावळ तालुक्यातील येथील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर आजुबाजूच्या गावांना जोडणारा लोखंडी पूल आहे. रविवार, दिनांक 15/06/2025 रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास हा लोखंडी पूल कोसळल्याची घटना घडली असून सदर लोखंडी पुलाच्या ठिकाणी अंदाजे 100 पर्यटक वर्षा विहारासाठी आले होते. सदर दुर्घटने मधून एकूण 38 व्यक्तींचा बचाव करण्यात आला आहे. त्यापैकी 18 व्यक्ती जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा, ता. मावळ येथील 1)पवना रुग्णालय, 2) मायमर हॉस्पिटल, 3) अथर्व हॉस्पिटल इत्यादी हॉस्पिटल मध्ये उपचाराकरीता दाखल केले आहे. उपचारा दरम्यान 02 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पूलाच्या कोसळलेल्या भागाखाली नदीपात्राच्या पाण्यात एकूण 03 व्यक्ती अडकले असल्याचे प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)चे 2 पथक, आपदा मित्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि PMRDA चे अग्निशमन दल व स्थानिक मदत बचाव संस्था इत्यादी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
38 जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश
पूलव कोसळल्यानंतर अनेक जण इंद्रायणी नदीत वाहून गेले. काही जण पुलामध्ये अडकले होते. एनडीआरएफने आतापर्यंत 38 जणांना वाचवले आहे.
25-30 जण वाहून गेल्याची एकनाथ शिंदे यांची माहिती
पूल कोसळल्यानंतर वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची भीती ही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर बांधलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. याठिकाणी फिरायला आलेले २५-३० पर्यटक हा पूल पडल्याने वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मी स्वतः…
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 15, 2025
पवना रुग्णालयात आतापर्यंत चार जणांना केलं दाखल
पनवा रुग्णालयात आतापर्यंत चार जणांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं डॉ. पल्लवी जोशी यांनी सांगितलं आहे. त्यातील दोघांना फ्रँक्चर झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. तर एकाच्या डोक्याला मार लागला असल्याची माहिती त्यांनी दिली. एकही मृत नसल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं.
पुलाच्या सांगाड्यात अडकलेल्या एका पर्यटकाला वाचवण्यात यश
कुंडळ्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. त्यावेळी पुलाच्या सांगाड्यात अडकलेल्या एका पर्यटकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवलं आहे. एनडीआरएफने त्याला बाहेर काढले आहे.
खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी दाखल
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मावळच्या कुंडमळा इथं दुपारी इंद्रायणी नदीवरी पुल कोसळला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी या ठिकाणी भेट दिली आहे.
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 15, 2025
या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या…
पडलेला लोखंडी पूल पूर्ण गंजला होता - अजित पवार
पडलेला लोखंडी पूल पूर्ण गंजलेला होता असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. घटनास्थळी एनडीआरएफ आणि प्रशासन पोचलेल आहे असं ही ते म्हणाले. त्या ठिकाणी आठ कोटीचा नवीन पूल मंजूर आहे असं ही अजित पवार पवार म्हणाले.
पुल कोसळला त्या ठिकाणची धक्कादायक छायाचित्र
कुंडमळ्यातील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला त्या ठिकाणची धक्कादायक छायाचित्र आली समोर.
ज्या ठिकाणचा पुल कोसळला त्या ठिकाणी छायाचित्र आली समोर
कुंडमळ्यात दुर्घटने ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी
कुंडमळ्यात पुल कोसळल्याची माहिती वाऱ्या सारखी सगळीकडे पसरली. त्यानंतर या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे बचाव कार्यात अडखळा निर्माण होत आहे. शिवाय रविवार असल्याने या ठिकाणी पर्यटकही मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत.
कुंडमळ्यात कोसळलेला पुल कटरने कापण्याचा प्रयत्न
कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील कोसळलेला पुल कटरने कापण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय क्रेनही बोलवण्यात आली आहे. या पुलाखाली काही जण अडकले असल्याची भीती ही व्यक्त केली जात आहे. त्या दुष्टीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
मावळ तालुक्यातील कुंडमळा ह्या पर्यटनस्थळी पूल कोसळून घडलेली दुर्घटना धक्कादायक- आदित्य ठाकरे
मावळ तालुक्यातील कुंडमळा ह्या पर्यटनस्थळी पूल कोसळून घडलेली दुर्घटना धक्कादायक तितकीच मनाला वेदना देणारी आहे. असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
मावळ तालुक्यातील कुंडमळा ह्या पर्यटनस्थळी पूल कोसळून घडलेली दुर्घटना धक्कादायक तितकीच मनाला वेदना देणारी आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 15, 2025
ह्या दुर्घटनेत इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचविण्यात बचाव पथकाला यश मिळू दे, सर्वजण सुखरूप असू देत; हिच ईश्वर चरणी प्रार्थना! pic.twitter.com/cyWyZYiQde
Live Update : कुंडमळा पुल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी माहिती
कुडमळा पुल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी माहिती दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 15, 2025
या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या…
खामगाव येथील मायलेकीचा विश्वगंगा नदीत बुडून मृत्यू
नांदुरा तालुक्यातील निंबादेवी देवस्थान येथील विश्र्वागंगा नदीत बुडून दोघींचा मृत्यू.
खामगाव येथील मायलेकीचा विश्वगंगा नदीत बुडून मृत्यू.
देवदर्शनासाठी गेल्या असता नदीत पाय घसरून पडल्याने दोन्ही बुडाल्या.
मलकापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी.
इंद्रायणी नदीवरील पुल वाहून गेला
इंद्रायणी नदीवरील हा पूल असून तो वाहून गेला आहे. स्थानिक आमदार सुनिल शेळके यांनी सात ते आठ जण मृत झाल्याची माहिती दिली आहे. २५ ते ३० जण वाहून गेल्याचं ही सांगितलं जात आहे. हा पुल मध्य भागी तुटला आहे. एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. हा पुल अत्यंत जून आहे. तो लोखंडी होता. नदीचा प्रवाह ही जोरात आहे. या भागात गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस झाला आहे.
बचाव कार्यासाठी सात ते आठ रुग्णवाहीका दाखल
मावळ उथे पुल कोसळला आहे. त्यात 25 पेक्षा जास्त लोक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. शिवाय घटना स्थळावर रुग्णवाहीका ही दाखल झाल्या आहेत.
बचाव कार्यासाठी सात ते आठ रुग्णवाहीका दाखल
मावळ उथे पुल कोसळला आहे. त्यात 25 पेक्षा जास्त लोक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. शिवाय घटना स्थळावर रुग्णवाहीका ही दाखल झाल्या आहेत.
मावळमध्ये कुंड मळ्यात पूल कोसळला, 25 जण बुडाल्याची भिती
पुण्यातील मावळमध्ये कुंड मळ्यात पूल कोसळल्याने काही पर्यटक बुडाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना साडेतीनच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले आहेत. कुंडमळा ओलांडण्यासाठी, या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे. हाच पूल कोसळला आहे. रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते. काही जण पुलावर उभारले होते. तेव्हा हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. अद्याप किती जण बुडाले आहेत. हे स्पष्ट होऊ शकलं नाही, अंदाजे 20 ते 25 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
Live Update : संगमनेरमध्ये ट्रॅव्हल बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर धडक, तिघांचा मृत्यू
संगमनेर तालुक्यातील कोकणगाव परिसरात कोल्हार घोटी महामार्गावर ट्रॅव्हल बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याच समोर येतय.. या अपघातात प्रविण सोपान कांदळकर राहणार सुकेवाडी तालुका संगमनेर, फिरोज लाला शेख संगमनेर अजू प्रविण वाल्मिकी राहणार हरीयाणा हे तिघे जण ठार झाले आहेत.. तर इतर सात जण गंभीर जखमी झाले आहे..
Live Update : पुण्यात फुरसुंगी नगरपरिषद कार्यालयावर जाहीर निषेध मोर्चा
फुरसुंगी परिसरात असणाऱ्या संकेत विहार पावर हाऊस परिसरातील नागरी सुविधांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला होता याच मोर्चाची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून फुरसुंगी उरळी नगरपरिषदेचे प्रशासक यांना या परिसरातील नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निवारण करा असे पत्र दिले होते.
Live Update : विजय रुपाणी यांचा डीएनए मॅच झाल्याची माहिती, कुटुंबीय थोड्याच वेळात रुग्णालयात पोहोचणार
विजय रुपाणी यांचा डीएनए मॅच झाल्याची माहिती, कुटुंबीय थोड्याच वेळात रुग्णालयात पोहोचणार
विजय रुपाणी यांचा परिवार थोड्याच वेळात विजय मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचणार.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी विजय रूपाणी यांच्या परिवाराशी साधला संवाद
पटेल यांनी परिवाराला डीएनए सॅम्पल मॅच झाल्याची माहिती दिली आहे
Live Update : वैजापूर तालुक्यात कोयत्याने वार करत पत्नीचा खून
छत्रपती संभाजीनगर -
वैजापूर तालुक्यात कोयत्याने वार करत पत्नीचा खून
गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार करत केला खून
अनिता चांगदेव शेलार असे 55 वर्षीय पत्नीचे नाव
तर पत्नीची हत्या करून पतीला आत्महत्या करतांना लोकांनी वाचवलं
वैजापूर पोलिसांकडून पसार झालेल्या आरोपी चांगदेव शेलार याचा शोध सुरू
Live Update : नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याचा फटका निर्दोष शिक्षकांना; वेतन रखडल्याने आंदोलनाचा इशारा
राज्यातील शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्यानंतर, अनेक शालेय शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार मार्च २०२५ पासून थांबवण्यात आले आहेत. शालार्थ आयडी प्रकरणामुळे अनेक शिक्षक वेतनापासून वंचित राहिले असून, नाराज कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Live Update : नालासोपाऱ्यात रस्त्यावर झाड कोसळल्याने रस्ता बंद
वसई विरार परिसरात झालेल्या पावसामुळे नालासोपारा येथील एवरशाईन सिटी मधे झाड उन्मळून पडले आहे. मधील आचोळे स्मशान भूमीकडे जाणाऱ्या आचोळे न्यू लिंक रोड येथे रस्त्यावर झाड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला आहे. राहादरीच्या रस्त्यावर रात्री उशिरा हे झाड कोसळले मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून, झाड कापून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Live Update : उघड्यावर खरमाती टाकणा-यांवर कोल्हापूर महापालिका दंडात्मक कारवाई
कोल्हापुरातील ढगफुटी सदृश्य पावसानंतर शहरामध्ये उघड्यावर खरमाती टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करा अशा सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी अवघ्या काही मिनिटात पाणी साचलेलं. इतकंच नाही तर राजाराम बांधाऱ्यावर कचऱ्याचा ढीग लागलेला. त्यामुळे आयुक्त कार्यालयात आपत्तीपूर्व नियोजन आणि नालेसफाईबाबत बैठक झाली. या बैठकीत ज्या ज्या ठिकाणी गटारे, चॅनल बंदीस्त केली आहेत ती गटारे अथवा चॅनल खुली करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या.
Live Update : पुण्यात श्वानाकडून अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला
पुण्यात श्वानाने केला अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला
पुण्यातील हडपसर भागात असलेल्या कामठी वस्ती परिसरात श्वानांचा मुलावर हल्ला
हल्ल्यात मुलगा किरकोळ जखमी
काल दुपारच्या सुमारास दोन अल्पवयीन मुले रस्त्याने जात असताना श्वानाच्या एका टोळक्याने या मुलावर हल्ला चढवला या हल्ल्यात हे दोन्ही मुलं श्वानापासून आपला जीव कसा वाचून पळून गेले..
पुण्यातील हडपसरत परिसरात वाढत्या श्वानाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे..
Live Update : रत्नागिरी जिल्ह्याला आज देखील पावसाचा रेड अलर्ट, रात्रीपासून पावसाची धुवाधार बॅटिंग
रत्नागिरी जिल्ह्याला आज देखील पावसाचा रेड अलर्ट
रात्रीपासून पावसाची धुवाधार बॅटिंग
सकाळपासून सरींवर पाऊस, तर काही ठिकाणी पावसाची विश्रांती
दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम
पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून
गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 114 मिलिमीटर पावसाची नोंद
मंडणगडमध्ये सर्वाधिक 177 मिलिमीटर पाऊस
त्या खालोखाल गुहागर 140, दापोली 138, रत्नागिरी 123, लांजा 118 मिलिमीटर पावसाची नोंद
आज दिवसभर पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता
याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी
24 तासातील जिल्ह्याची आकडेवारी
१) मंडणगड -177.50 मिमी
२) गुहागर - 140.00 मिमी
३) दापोली - 138.85 मिमी
४) रत्नागिरी - 123.33 मिमी
५) लांजा - 118.80 मिमी
६) खेड - 95.00 मिमी
७) चिपळूण - 88.00 मिमी
८) राजापूर - 81.75 मि मि
९) संगमेश्वर -64.00 मिमी
Live Update : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत भाजपची आज समन्वय बैठक, थोड्यात वेळात होणार सुरुवात
थोड्याच वेळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत भाजपची आज समन्वय बैठक
रेशिमबाग येथील डॉ हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात आज होणार बैठक
भाजपचे राज्यातील काही पदाधिकारी पोहोचणार
Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथील पिव्हीसी पाईपच्या गोडाऊनला आग
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथे एका पिव्हीसी पाईपच्या गोडाऊनला आग
मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास लागली गोडाऊनला आग
गोविंद चावरे असे गोदाम मालकाचे नाव
आगीत गोदामातील पन्नास साठ लाखांचे पिव्हीसी पाईप जाळून खाक
अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू
पाचोड पोलीस घटनास्थळी दाखल, आगीचं कारण अद्याप अस्प
Live Update : उभ्या टँकरला ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर दोन जण जखमी...
वाशिमच्या अकोला - नांदेड महामार्गावरील मेडशी बाय पासजवळ टँकर आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याने दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे, तर दोघे जण गंभीर जखमी आहेत. धडक देणारा ट्रक चालक आणि त्याचा सोबती फरार झाले आहेत.
मेडशी बाय पास जवळील सरपंच हॉटेल समोर उभ्या असलेल्या टँकरला मालेगावच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने मागच्या बाजूस जबर धडक दिल्याने उभा टँकर पलटी होऊन भीषण अपघात घडला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर टँकरला मागील बाजूने धडक देणारा ट्रक चालक आणि त्याचा सोबती फरार झाला असून त्यांचा मालेगाव पोलीस शोध घेत आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने महामार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
Live Update : पुण्यातील KEM हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी
पुण्यातील KEM हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी
पुणे पोलिसांना मेल वरून आली धमकीत
पुणे पोलीस आणि BDDS च पथक घटनास्थळी
अज्ञात व्यक्तीकडून पुणे पोलिसांना आला मेल
पुणे पोलिसांकडून तपास सुरू
Live Update : रस्त्याच्या कामामुळे सप्तश्रृंगगडावर वाहतूक कोंडी, भाविकांचे हाल
उत्तर महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असलेल्या नाशिकच्या सप्तशृंग गडावरील घाटात सुरू असलेले रस्ता सिमेंट क्रॉंक्रीट काम संथ गतीने सुरू आहे.त्यातच साईड पट्टया भरल्या न भरल्याने अर्धा ते एक फुट खोल खडकी निर्माण झाल्याने घाटात तासनतास वाहतूक कोंडी होत असल्याने भाविक व प्रवाश्यांना अतोनात हाल सोसावे लागत आहे.
तसेच अनेक काळी माती टाकून या साईडपट्ट्या भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाने बारकाईने लक्ष देऊन दर्जेदार काम करून घेण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनचालक भाविकांकडून करण्यात येत आहे.