जाहिरात

Big News : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन उघड; मोठी माहिती आली समोर

Kashmir Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तोय्यबा या संघटनेचा मॉड्यूल सामील असल्याचं समोर आले आहे.

Big News : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन उघड; मोठी माहिती आली समोर

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 27 सर्वसामान्य पर्यटकांचा हकनाक बळी गेला. काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप नागरिकांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात केंद्राकडून अनेक पावलं उचलली जात आहेत. मात्र काश्मीरमधील मोठी सुरक्षा असतानाही हा हल्ला कसा झाला, यासाठी स्थानिकांनी मदत केली होती का? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एजन्सीनुसार, 

    •    या हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना लष्करी प्रशिक्षण दिलं गेलं होतं.
    •    काही माजी दहशतवाद्यांची चौकशी केल्यानंतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.
    •    या दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुप (SSG) कडून प्रशिक्षण घेतलं. 
    •    हाशिम मूसा नावाचा पाकिस्तानी दहशतवादी स्वतः पाकिस्तानमध्ये SSG चा पॅरा-कमांडो राहिला आहे.
    •    हे दहशतवादी स्थानिक दहशतवाद्यांचे लहान लहान गट लीड करत आहेत.
    •    हे FT म्हणजेच फॉरेन टेररिस्ट, जे पाकिस्तानातील आहेत.
    •    हे दहशतवादी लष्कर-ए-तोय्यबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनांशी संबंधित आहे.
    •    पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तोय्यबा या संघटनेचा मॉड्यूल सामील असल्याचं समोर आले आहे.
     •   काश्मीरमध्ये अधिकाधिक विध्वंस घडवणे ही  ISI ची योजना आहे. 

Pakistan Violated Ceasefire : पाकिस्तानकडून सलग 11 दिवशी गोळीबार, भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर

नक्की वाचा - Pakistan Violated Ceasefire : पाकिस्तानकडून सलग 11 दिवशी गोळीबार, भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर

या प्रमुख घटनांमध्ये SSG कमांडोंचा सहभाग स्पष्ट
    •    गगनगीर, गांदरबल येथे झालेल्या हल्ल्यात सात जण मारले गेले
    •    बूटा पथरी येथे आर्मीच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद आणि दोन पोर्टर ठार
    •    पहलगाम दहशतवादी हल्ला
    •    या सर्व घटनांमध्ये पाकिस्तान आर्मीच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुप (SSG) कमांडोंचा थेट सहभाग असल्याचे उघड झालं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: