जाहिरात

Pakistan Violated Ceasefire : पाकिस्तानकडून सलग 11 दिवशी गोळीबार, भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, 4-5 मे रोजी रात्रीच्या वेळी पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांच्या दिशेने पुन्हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैनिकांनीही जशासतसं उत्तर दिलं आहे. 

Pakistan Violated Ceasefire : पाकिस्तानकडून सलग 11 दिवशी गोळीबार, भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर

Pakistan Violated Ceasefire : पहलगाम हल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. भारतात सातत्याने पाकिस्तानवर विविध मार्गांना आर्थिक हल्ला करत आहेत. आधीच कंगाल पाकिस्तानची यामुळे आणखीच जिरली आहे. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. पाकिस्तानने सलग 11 व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पाकिस्तानकडून LOC लहान शस्त्रांद्वारे सतत भारताच्या दिशेने गोळीबार केला जात आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, 4-5 मे रोजी रात्रीच्या वेळी पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांच्या दिशेने पुन्हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैनिकांनीही जशासतसं उत्तर दिलं आहे. 

( नक्की वाचा : कोण आहेत PM मोदींचे 7 महारथी? जे लिहिणार पाकिस्तानच्या बरबादीची कहाणी )

पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर येथील नियंत्रण रेषेवर सातत्याने गोळीबार होत आहे. पाकिस्तानच्या सैन्याकडे दारूगोळ्याची मोठी कमतरता भासत आहे, अशी माहिती गुप्तचर अहवालातून मिळत आहे. जर युद्ध झालंच तर पाकिस्तान या युद्धात चार दिवसांपेक्षा जास्त टिकूही शकणार नाही. 

पाकिस्तानने युक्रेन आणि इस्रायलसोबत शस्त्रास्त्रांचे करार केले आहेत. मात्र दोन्ही देश आधीच युद्धात गुंतलेले असल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत भर पडली आहे त्यामुळे पाकिस्तान युद्धाच्या पोकळ धमक्या देत असला तरी ही या फडफडीला कुठलाही आधार नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. 

(नक्की वाचा-  Pehalgam Terror Attack: भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची भंबेरी, लष्करी युद्ध सरावाला सुरुवात)

तुम्हाला जे हवं आहे, ते होईल- राजनाथ सिंह

राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, भारतीय सैनिक सदैव देशाचं संरक्षण करत असतात. एकीकडे आपले सैनिक सीमेवर जागता पहारा देत असतात. तर दुसरीकडे माझं कर्तव्य आहे की, सैनिकांसोबत उभं राहून मी देखील देशाचं सरंक्षण केलं पाहिजे. भारताकडे वाकड्या नजरेने पाहाणाऱ्यांना जशासतसं उत्तर दिलं जाईल. तुम्हाला जे हवं आहे, ते होईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती आणि जिद्द तुम्हाला माहितच आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: