Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये (Bihar Assembly Election Results) एनडीएने मोठी आघाडी घेतली आहे. आता विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. निकालांच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये एनडीए सुमारे 200 जागांच्या जवळ पोहोचल्यामुळे काँग्रेस नेते पवन खेरा यांनी गंभीर आरोप केले आहेत.
ज्ञानेश कुमार यांच्यावर थेट निशाणा
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी महागठबंधनच्या कामगिरीबद्दल आणि एनडीएच्या मोठ्या आघाडीबद्दल प्रतिक्रिया देताना, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर थेट आरोप केला. खेरा म्हणाले, "सध्याच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये नक्कीच असे दिसत आहे की ज्ञानेश कुमार हे बिहारच्या जनतेवर भारी पडत आहेत."
(नक्की वाचा- Bihar Election Results 2025: बिहारमध्ये एनडीएचे जोरदार आघाडी! काँग्रेसची पिछेहाट; वाचा लाईव्ह अपडेट्स)
त्यांनी पुढे म्हटले की, 'एसआयआर आणि वोट चोरी' असूनही बिहारच्या जनतेने पूर्ण हिंमत दाखवली आहे.पवन खेरा यांनी एनडीएला मिळत असलेल्या मोठ्या विजयावर टिप्पणी करताना व्यंगात्मक विधान केले की, "हा एनडीएचा नव्हे, तर ज्ञानेश कुमार यांचा विजय आहे."
पवन खेरा यांनी सुरुवातीच्या ट्रेंड्सवर बोलताना सांगितले की, "सध्याचे ट्रेंड्स प्राथमिक आहेत. आगामी काही तासांत बिहारची जनता भारी पडेल की ज्ञानेश कुमार, हे स्पष्ट होईल. मी बिहारच्या जनतेला कमी लेखू शकत नाही."
बिहारमध्ये NDA ची मोठी आघाडी
सध्याच्या निकालांच्या ट्रेंड्समध्ये NDA मोठ्या फरकाने पुढे आहे आणि भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. JDU आणि भाजप यांच्यात 'मोठा भाऊ' कोण ठरणार, याबद्दलही चुरस दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world