जाहिरात

स्वप्न अधूरं राहिलं...हळदीच्या कार्यक्रमात नाचताना नववधुचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये एका कुटुंबात लग्नाच्या सोहळ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

स्वप्न अधूरं राहिलं...हळदीच्या कार्यक्रमात नाचताना नववधुचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये एका कुटुंबात लग्नाच्या सोहळ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. 22 वर्षीय दीक्षाच तिच्याच लग्नापूर्वी हृदयविकाऱ्याच्या झटक्यानं मृत्यू झाला. ही घटना इस्लामनगर पोलीस ठाण्यातील नूरपूर पिनौनी गावात रविवारी रात्री घडली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, कुटुंबीयांनी सांगितलं की, रविवारी रात्री दीक्षा आपली बहीण आणि नातेवाईकांसोबत हळदीच्या कार्यक्रमात नाचत होती. यादरम्यान तिला अचानक चक्कर आली आणि अस्वस्थ वाटू लागलं. फ्रेश होण्यासाठी ती बाथरूममध्ये गेली. मात्र बराच वेळ बाहेर आली नाही. 

Kalyan News : KDMC चा कहर, 5 तास रुग्णवाहिका नाही, हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळच महिलेचा मृत्यू

नक्की वाचा - Kalyan News : KDMC चा कहर, 5 तास रुग्णवाहिका नाही, हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळच महिलेचा मृत्यू


बाथरूममध्ये नवरीचा मृतदेह...
कुटुंबीयांनी बाथरूमचं दार ठोठावला, पण समोरून काहीच उत्तर आलं नाही. त्यांनी दार तोडलं तर दीक्षा जमिनीवर पडली होती. कुटुंबीयांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. 

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरादाबाद जिल्ह्यातील शिवपुरी गावातील निवासी सौरभशी दीक्षाचं लग्न ठरलं होतं. सोमवारी त्यांचं लग्न होणार होतं. मात्र त्यापूर्वीच रविवारी दीक्षाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून घरात लग्नाची तयारी सुरू होती. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. लेकीच्या लग्नाचं प्लानिंग तयार होतं. हळदीच्या कार्यक्रमातही सर्वजण खूप नाचले. दीक्षाही एन्जॉय करीत होती. आपल्या भविष्याचं स्वप्न रचत होती. मात्र त्याचपूर्वी दीक्षाचा मृत्यू झाला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com