जाहिरात

Viral Video : "प्लीज गाडी थांबवा, माझी मुलगी सोबत आहे", कॅबमध्ये कुटुंबासोबत काय घडलं?

Viral Video : व्हिडीओत मुलाचा भीतीमुळे ओरडण्याचे आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहेत. पीडित व्यक्तीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्याने आपली आपबीती सांगितली आहे.

Viral Video : "प्लीज गाडी थांबवा, माझी मुलगी सोबत आहे", कॅबमध्ये कुटुंबासोबत काय घडलं?

Viral VIdeo : उत्तर प्रदेशच्या नोएडा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कॅब चालकाने पोलिसांपासून वाचण्यासाठी स्वतःचा आणि गाडीतील एका प्रवासी कुटुंबाचा जीव धोक्यात घालत अत्यंत बेदरकारपणे गाडी पळवली. ही घटना ग्रेटर नोएडा वेस्ट येथील परथला पुलाजवळ घडली, जिथे वाहतूक पोलिसांनी कॅबला थांबण्याचा इशारा दिला होता. मात्र, चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून गाडीचा वेग वाढवला आणि भरधाव वेगाने गाडी पळवायला सुरुवात केली.

कॅबमध्ये एक व्यक्ती, त्याची पत्नी आणि लहान मुलासह प्रवास करत होते. हे कुटुंब ग्रेटर नोएडा येथून दिल्लीतील कनॉट प्लेसकडे जात होते. जेव्हा चालकाने पोलिसांना पाहून गाडीचा वेग वाढवला, तेव्हा कुटुंबातील सदस्य घाबरले. त्यांनी चालकाला गाडी हळू चालवण्याची वारंवार विनंती केली. पण चालकाने त्यांचे ऐकले नाही आणि निष्काळजीपणे गाडी चालवत राहिला. याच दरम्यान, कॅबची कथितरित्या दुसऱ्या एका गाडीला धडक बसली, ज्यामुळे कुटुंबाची भीती आणखी वाढली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

(नक्की वाचा-  GST Reform: PM मोदींनी GST बद्दल केलेल्या घोषणांचा अर्थ काय? कोणत्या वस्तू स्वस्त होणार?)

प्रवासी कुटुंबाने हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडीओत मुलाचा भीतीमुळे ओरडण्याचे आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहेत. पीडित व्यक्तीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्याने आपली आपबीती सांगितली आहे. हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे ॲप-आधारित आणि खाजगी कॅबमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

व्हिडिओ व्हायरल होऊनही कुटुंबाने अद्याप पोलिसांत कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही. पोलिसांनीही या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. सोशल मीडियावर लोक चालकांना योग्य प्रशिक्षण देण्याची आणि पोलिसांना अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com